मुंबई

एका बॅगमुळे हार्बरवरील वाहतूक ‘ब्लॉक’!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल सेवा अनेक कारणांमुळे विस्कळित झाल्याचे अनेक वेळा आपण पाहिले असेल; पण शनिवारी (ता. १४) या मार्गावरील वाहतूक विस्कळित होण्यामागे वेगळेच कारण होते. एका अज्ञात व्यक्तीने ओव्हरहेड वायरवर बॅग फेकली. ती तशीच लटकत राहिली; मात्र या लटकत्या बॅगमुळे पनवेल ते खांदेश्‍वरदरम्यान सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला आणि काही वेळेसाठी प्रवासीही लटकले. दुपारी २.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. 

हार्बर मार्गावरील पनवेल ते खांदेश्‍वर दरम्यान शनिवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर बॅग फेकली. या बॅगमुळे लोकलसेवा काही वेळ पूर्णपणे ठप्प झाली होती. सुमारे अर्धा तास पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल सेवा बंद होती. या घटनेची माहिती मिळताच ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. तसेच रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाने घटनास्थळी धाव घेत ओव्हरहेड वॉयरवर लटकत राहिलेली बॅग काढली. दुपारी तीनच्या सुमारास लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. ३ वाजता पनवेलहून छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने पहिली लोकल रवाना झाली असली, तरी अप मार्गावरील गाड्या सुमारे १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मात्र याचा इन्कार केला.

पनवेल ते खांदेश्‍वरदरम्यान २.३० च्या सुमारास लोकल सेवा १० मिनिटांसाठी थांबवण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच लोकल सेवा सुरू करण्यात आली. त्याचा इतर वेळेतील सेवेवर काहीही परिणाम झाला नाही.
- ए. के. जैन, 
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT