ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी
ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी  
मुंबई

ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे टी-जंक्‍शन येथे नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून कल्वर्टचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे ऐरोली नॉलेज पार्क रस्त्यामार्गे अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात आली आहे. यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर सकाळी व सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

रबाळे टी जंक्‍शनजवळ दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे, या ठिकाणच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे पालिकेने या रस्त्याचे काम हाती घेतले असून, या ठिकाणची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. वाशीकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने, ऐरोली नॉलेज पार्क रस्त्यामार्गे; तर मुंबईकडून येणारी वाहने ऐरोली नॉलेज पार्कमार्गे घणसोलीकडे वळवण्यात आली आहे. मात्र, दोन आठवड्यांपासून रबाळे टी जंक्‍शन येथे कल्वर्टचे काम सुरू आहे. या कामामुळे वाशीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील केवळ एकच पदर सुरू आहे. त्यामुळे रबाळे टी-जंक्‍शनपासून रबाळे येथील भूषण बारजवळील सिग्नलपर्यंत नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. त्याचप्रमाणे ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजली सर्कलपासून रबाळे टी-जंक्‍शनपर्यंत व ठाण्याकडून वाशीकडे जाणाऱ्या मार्गावर रबाळे टी-जंक्‍शनपर्यंतच्या सिग्नलपासून ऐरोली माईंड स्पेस कंपनीपर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

रबाळे टी-जंक्‍शनजवळील कामामुळे रबाळे येथील भूषण बारजवळील सिग्नलपर्यंत दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्याचप्रमाणे भारत बिजली सर्कलपासून माईंड स्पेस कंपनीपर्यत वाहतूक कोंडी होत असल्यामुळे त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- राहुल जोते, वाहनचालक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT