मुंबई

Mumbai Rain: साध्या हलक्या सरींमुळे मुंबईत वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त

Mumbai Traffic: कुठे सिग्नल बिघाड, तर कुठे वाहतूक पोलिस नसल्याने मुंबईकरांचे हाल

सकाळ वृत्तसेवा

Mumbai: मुंबईत शुक्रवारी झालेल्या हलक्या सरींमुळे विविध ठिकाणी वाहतूक व्यवस्थेला फटका बसला. अनेक ठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे, तसेच कुठे सिग्नल बिघाड, तर कुठे वाहतूक पोलिस नसल्याने मुंबईकरांचे हाल झाले. त्यामुळे मुंबईकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.

मुंबईत सकाळी सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांनी प्रमुख जंक्शन्सवर सिग्नल सुरू नसल्याच्या तक्रारी केल्या, तर काही वाहनचालकांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर वाहतूक हाताळण्यासाठी वाहतूक अधिकारी नाहीत.

कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सकाळी होणाऱ्या गर्दीमुळे २० ते २५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी अडकून पडावे लागले. दुसरीकडे मुंबई वाहतूक पोलिसांनी या तक्रारींवर समस्या वायरलेसला कळवण्यात आली आहे आणि वाहतूक कोंडी लवकरात लवकर सोडवला जाईल, असे उत्तर दिले. दरम्यान काही वेळाने वाहतूक पूर्ववत झाली. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला.

वाहतूक कोंडी झालेली ठिकोणे

- मरोळ पोलिस कॅम्प ते सेव्हन हिल्स

- लोअर परेल पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क सिग्नल पुलाखाली

- वरळी सी फेस दक्षिणेकडे बिंदू ठाकरे चौकाकडे ठप्प

- अमर महल जंक्शन येथे.

- सायनकडे जाणारा कुर्ला अंडरपास ब्लॉक

- पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील दक्षिण वाहिनी

- वरळी नाका वाहतूक पोलिस मुख्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari PA Murder : सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची गोळ्या झाडून हत्या; तृणमूल काँग्रेसची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Rehabilitation News: धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार: मंत्री मकरंद पाटील, मंत्रालयातील बैठकीत महत्त्वाचे निर्णय, बेकायदेशीर जमीन वाटपाची होणार पुनर्तपासणी!

LPG Cylinder Price List: एलपीजी सिलिंडरच्या नवीन दरसूची जाहीर; घरगुती ते व्यावसायिक सिलिंडरची किंमत जाणून घ्या

Maharashtra Education News: शिक्षण विभागाचा माेठा निर्णय! शिक्षकांसाठी वार्षिक ५० तास प्रशिक्षण सक्तीचे, गुणवत्तावाढीसाठी सरकारचे पाऊल..

Suvendu Adhikari assistant Killed : सुवेंदू अधिकारींचा पीए चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, ममतांवर आरोप; असा आहे घटनाक्रम

SCROLL FOR NEXT