Train accident near Matunga railway station three coaches derailed  SAKAL
मुंबई

माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेचा मोठा अपघात; तीन डबे रुळावरून घसरले

रोहित कणसे

मुंबई : आज रात्री पावणे दहाच्या सुमारास माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे क्रमांक 11005 दादर पुद्दुचेरी एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला. गदक एक्सप्रेस आणि पॉंडीचेरी एक्सप्रेस बाजूने एकमेकांवर आदळल्या, या दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात होत्या आणि क्रॉसिंगवर एकाच ट्रॅकवर आल्या त्यामुळे हा आपघात झाला. यामध्य पॉंडीचेरी एक्सप्रेसचे शेवटचे डबे रेल्वेरुळावरून घसरले.

दादर-माटुंगादरम्यान झालेल्या हा रेल्वे अपघात ट्रॅक बदलताना दोन रेल्वे एकमेकांवर आदळल्याने झाला. अपघातादरम्यान इंजिनजवळ आग देखील लागल्याचे समोर आले. यानंतर सीएसटीच्या दिशेने जाणारी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान आपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही असे, मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे.

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

दादरहुन ही एक्स्प्रेस रवाना होताच माटुंगा स्थानकाजवळ हा अपघात झाला. डबे रुळावरून घसरले असले तरी, या अपघातात आतापर्यंत कोणालाही दुखापत झाली नाही, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. दरम्यान, अभियांत्रिकी पथक, पोलिस, आरपीएफ कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, घटना स्थळी दाखल झाले. गाडीतील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत आहेत, तर गाडीतील काही प्रवाशांनी घाबरून घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगण्यात आले.

वाहतुक पूर्वरत करण्यासाठी काम सुरू

यानंतर मध्य रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली असून दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील जलद आणि एक्स्प्रेस गाड्या पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थगित झाल्याने CSMT स्टेशनवर खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली. तर या घटनेचा तपास केला जाईल, त्यासोबतच वाहतुक पूर्वरत करण्यासाठी काम सुरू आहे असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT