file photo 
मुंबई

कोरोनाला रोखण्यासाठी आता आयुष डॉक्‍टरांची फौजही मदतीला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्‍यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्‍टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात आवश्‍यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे दीड हजार व्हेंटिलेटर, अडीच लाख एन 95 मास्क उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 


राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत सोशल डिस्टंसिंग राखावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी या वेळी केले. 
आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात आरोग्य पथकांमार्फत क्‍लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेतून सर्वेक्षणाबरोबरच कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 9 लाख लोकांचे ट्रेसिंग करण्यात आले आहे. यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 
आवश्‍यकता भासल्यास राज्यात आरोग्यसेवेसाठी पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ असावे, यासाठी राज्यातील आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी या आयुष डॉक्‍टरांची सेवा घेता यावी, याकरिता त्यांना आठवडाभरात कोरोनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आजच आयुषच्या 250 मुख्य प्रशिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्‍टरांना प्रशिक्षण देण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 


कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी उपकरणे आणि साधनसामुग्री आहे. 25 हजार पीपीई किट, दीड हजार व्हेंटिलेटर असून अडीच लाख 95 मास्क उपलब्ध आहेत. राज्यात लवकरच नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध होणार असून आवश्‍यकता भासल्यास केंद्र शासनाकडून उपकरणांचा पुरवठा राज्याला केला जाईल, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सागितले. 

खासगी दवाखाने सुरू करा 
खासगी दवाखाने बंद ठेवणे चुकीचे असून डॉक्‍टरांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. नागरिकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी योग्य आहार, व्यायाम, परेशी झोप, यासोबतच क जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन करताना नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. घराबाहेर पडू नये. जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! तरुणावर ८ जणांचा गोळीबार, जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी; घटनेनं खळबळ

IND vs ENG 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदर OUT, रोहित शर्मावर सस्पेन्स कायम! तिसऱ्या वन डेत कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Latest Marathi News Live Update : जंतर मंतरवरील आंदोलनात गोंधळ, अभिजीत दीपकेंवर शाईफेक

भारताच्या अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास! देशातील पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट 'Vikram-1' लाँच

Credit Card Rule: क्रेडिट कार्डवर किती खर्च करावा? पगाराच्या ‘या’ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च पडू शकतो महागात; पाहा नियम

SCROLL FOR NEXT