मुंबई

सूर्यवंशीला शस्त्र हाताळण्याचेही प्रशिक्षण? 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - नालासोपारा स्फोटकांप्रकरणी दहशवादविरोधी पथकाने (एटीएस) जळगावमधून अटक करण्यात आलेला वासुदेव सूर्यवंशी (29) याने तीन वर्षांपूर्वी शस्त्र हाताळण्याचेही प्रशिक्षण घेतल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे; मात्र शस्त्रे हाताळण्यासाठीचे प्रशिक्षण त्याने स्वत:हून घेतले, की नेमक्‍या कोणत्या सूत्रधाराकडून त्याला हे प्रशिक्षण मिळाले; या दिशेने दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. 

दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येत असलेला सहभागी गट एकमेकांशी टोपण नावाने संपर्कात होता. त्यानुसार या गटात सूर्यवंशी मेकॅनिक नावाने प्रचलित होता. याप्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याच्याकडे सापडलेल्या डायरीनुसार मेकॅनिकने तीन वर्षांपूर्वी शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले होते, तो सूर्यवंशीच असण्याची शक्‍यता आहे; पण सूर्यवंशी तपासात सहकार्य करत नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. 

सूर्यवंशीचे जळगावमधील साकळीत गॅरेज आहे. गौरी लंकेश, नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत सहभागी असणाऱ्यांची वाहने नष्ट करून पुरावे मिटवण्याच्या प्रयत्नात त्याचा सहभाग असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. याशिवाय गौरी लंकेश यांच्या घराची रेकी करण्यासाठी आरोपींनी वापरलेली वाहने बीडमध्येच नष्ट करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सनबर्न फेस्टिवलच्या रेकीवेळीही पुरवण्यात आलेल्या दुचाकी सूर्यवंशीमार्फतच आल्या होत्या. त्याचकाळात या प्रकरणात अटक करण्यात आलेला आणखी एक आरोपी लीलाधर लोधी याच्या संपर्कात होता, असा संशय पोलिसांना आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT