मुंबई

मोठी बातमी - ऐन लॉक डाऊनमध्ये आता पोलिसांच्या बदल्या... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता.24: वांद्रे स्थानकाबाहेर मजुरांच्या गर्दीप्रकरणानंतर वांद्रे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांची वाहतूक विभागात बदली करण्यात आली. त्यांच्यासह 10 अधिकाऱ्यांची खांदेपालट झालीये.

स्थलांतरीत मजूर लॉक डाऊनमुळे स्त्रस्त होते, उपाशी होते, तसेच कोणत्याही स्थितीत त्यांना घरी जायचे होते. त्या मानसिकतेमुळे आल्यामुळे हा प्रकार घडल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. पंतप्रधानांनी जाहिर केल्याप्रमाणे त्या दिवशी लॉक डाऊनचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे त्या दिवशी त्याच्यासाठी काही जाहिर होईल, या प्रतिक्षेत ते होते. रेल्वे सेवा सुरू होण्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी वृत्तवाहिन्यांवर रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत वृत्त दाखवण्यात आले. काही व्यक्तींनी फेसबुकवर व्हिडिओ व मजकुर अपलोड केला. त्यामुळे अफवांना बळकटी मिळाली.

बांद्रा स्थानकाजवळ मजुरांना खाद्य पदार्थ देण्यात येते. त्यामुळे तेथील सरकारी व्यक्तींसोबत बोलण्याच्या उद्देशाने एक छोटा गट सर्वप्रथम तेथे आला. त्यानंतर बांद्रा स्थानकाजवळ आपल्या व्यथा ऐकल्या जात सरकारी व्यक्ती, प्रसिद्धी माध्यम, पोलिस आले असल्याची माहिती एकमेकांद्वारे पसरली गेली. ही अफवा एवढ्या लवकर पसरली त्यामुळे बाजूच्या झोपडपट्टीतील शेकडो लोक तेथे पोहोचली. त्यावेळी आपली बाजू ऐकून आपल्याला गावाकडे जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था केली जाईल, या मानसिकतेत ते मजूर होते. त्यामुळे अधिकाधिक व्यक्ती सरकारी व्यवस्थेवर दबाव टाकण्याच्या उद्देशाने तेथे जमा झाले. मात्र लॉकडाउनच्याकाळात इतके मजूर रस्त्यावर येत असताना वांद्रे पोलिसांना जराही सुगावा न लागणे याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यातआले. तसेच कारवाईची मागणीही जोर धरत होती.

दरम्यान अखेर, गुरूवारी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी प्रशासकीय कारणात्सव केलेल्या 10 अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीत हिरेमठ यांचाही समावेश करत त्यांची वाहतुक विभागात बदली केली. तर त्यांच्या जागी मुख्य नियंत्रण कक्षातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक निखिल कापसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याचबरोबर भोईवाडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शिरीष सावंत यांची गुन्हे शाखेत तर त्यांच्या जागी गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त संगीता पाटील यांची नेमणूक केली. मध्य नियंत्रण कक्षात बदली केलेल्या पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची पुन्हा गुन्हे शाखेत नियुक्ती केली. काळाचौकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय बसवत यांची सशस्त्र पोलिस दलात बदली केली. काळाचौकी पोलिस ठाण्याची धुरा सशस्त्र पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोकुळसिंह पाटील यांच्याकडे असेल. विशेष शाखा एकचे सहायक पोलिस आयुक्त दिनेश देसाई अंधेरी विभागाची जबाबदारी पाहतील. त्यांच्या रिक्त जागी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील सहायक पोलिस आयुक्त प्रशांत मर्दे यांची नियुक्ती झाली. तर, मुख्यालय दोनचे सहायक पोलिस आयुक्त माणिकसिंह पाटील यांची कुलाबा विभागाच्या सहायक आयुक्त पदावर नियुक्ती झाली. येणाऱ्या काळात आणखी काही पोलिसांच्या बदल्या होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

transfer of ten police officers including including vijayalaxmi hiremath

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा ओपेरा हाऊसजवळ दाखल

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT