Transgender sakal media
मुंबई

अर्थसंकल्पातील तरतुदींवर तृतीयपंथीय समुदायाकडून कृतज्ञता; मंत्र्यांचे मानले आभार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने (mva government) नुकत्याच मांडलेल्या राज्य अर्थसंकल्पात तृतीयपंथी समाजाला (Transgender community) विशेष स्थान देत त्यांच्या विकासाचे मार्ग खुले केल्याने तृतीयपंथी समाजाकडून त्याचे स्वागत केले जात आहे. समाजाच्या विविध मागण्या मान्य करून तरतुदी केल्याने समुदायाने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यासह राज्य शासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
तृतीयपंथी समुदायाच्या विविध समस्यांकडे मुंडे यांचे लक्ष वेधण्यात आले होते.

या दुर्लक्षित समुदायाच्या अनेक समस्या शासनाने प्राधान्यक्रमाने सोडवाव्यात, अशी मागणीही त्यांना केली होती. या प्रवर्गाचा संजय गांधी निराधार योजनेमध्ये प्राधान्यक्रमाने समावेश करावा, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, कोणी अपमानजनक वागणूक दिल्यास कठोर शिक्षेची तरतूद करावी, राहण्यासाठी शासकीय वसतिगृहाची सोय, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात. शिवाय समुदायासाठी ओळखपत्र व इतर कागदपत्रे बनविण्यासाठी स्वतंत्र प्रणाली वापरून त्यांना कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या राज्यातील संघटनांकडून निवेदनाद्वारे केल्या होत्या.

राज्याच्या आर्थिक विकासाची पंचसूत्री असलेल्या राज्य अर्थसंकल्पात या वेळी तृतीयपंथी समाजाला विशेष स्थान मिळाले आहे. त्यामुळे या समाजाला खूप मोठा आधार मिळणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी सरकार आणि विरोधी पक्ष सदस्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

- वर्षा विद्या विलास, सदस्य, तृतीयपंथी कल्याणकारी हक्क संरक्षण मंडळ.

महाविकास आघाडी सरकार राज्यातील तृतीयपंथी समाजाला सन्मानाने जगता यावे यासाठी आणि त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्पात त्यांचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्या विकासाचे मार्ग निर्माण केले जाणार असल्याचे दाखवून दिले आहे.

- धनंजय मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT