मुंबई

साध्या दरात एसी बसने प्रवास; एनएमएमटीचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई - तिकीटदर अगदी पाच रुपयांवर आणून ठेवलेल्या बेस्टसोबत स्पर्धा करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने एनएमएमटीच्या परतीच्या प्रवासात थेट दहा टक्के कपातीत प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना दिली आहे. तसेच केंद्र सरकारच्या फेम योजनेंतर्गत मिळालेल्या 15 इलेक्‍ट्रिक एसी बसचा प्रवास साध्या बसच्या दरातून उपलब्ध केला आहे. महापालिकेच्या या अनोख्या शक्कलपाई दिवसाला सुमारे दीड हजार प्रवाशांची वाढ झाल्याचे एनएमएमटी प्रशासनाने सांगितले. 

काही महिन्यांपूर्वी बेस्टने तिकीट दरात कपात केल्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन व्यवस्थेकडूनही (एनएमएमटी) दरकपात करण्याचा विचार सुरू होता. मात्र, दरकपात केल्यास आधीच महिन्याला होत असलेला पाच कोटींच्या तोट्यात आणखीन सव्वा कोटीची वाढ होण्याची भीती एनएमएमटी प्रशासनाला होती. त्यामुळे तूर्तास तरी तिकीट दरकपात पुढे ढकलण्यात आली होती. बेस्टने तिकीट दर कमी केल्यामुळे त्याचा सर्वात जास्त परिणाम नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेवर झाला. बेस्टच्या दरकपातीमुळे एनएमएमटीची दरदिवशी 20 हजार प्रवाशांची घट झाली. त्यामुळे एनएमएमटीचे दिवसाचे 40 लाख रुपयांचे उत्पन्न, थेट 35 लाखांवर आले. बेस्टच्या निर्णयामुळे एनएमएमटीला दिवसाला तब्बल पाच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा महिनाकाठी तब्बल सव्वा कोटींच्या घरात जात आहे. त्यामुळे एनएमएमटीतर्फेही बेस्टकडे वळलेले प्रवाशी आपल्याकडे खेचून आणण्यासाठी एनएमएमटीने गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या प्रवासावर दहा टक्के कपात केली आहे. ही सवलत वातानुकूलित व साध्या बसच्या प्रवाशांना लागू केली आहे. मंत्रालय, सरकारी कार्यालये, कोर्टकचेऱ्या व रुग्णालयांसारख्या एकाच मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारतर्फे एनएमएमटीच्या ताफ्यात आलेल्या 15 एसी इलेक्‍ट्रिक बसही रस्त्यावर धावण्यास सुरुवात केली आहे. 40 प्रवाशांची आसनक्षमता असणाऱ्या या बस सध्या नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत सुरू केल्या आहेत. 

प्रवासी संख्येत वाढ 
परतीच्या प्रवासात दहा टक्के तिकीट कपात आणि साध्या दरात एसी बसने प्रवास अशा दोन्ही सवलती एनएमएमटीने लागू केल्यामुळे एनएमएमटीच्या प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. साध्या बसच्या तिकीट दरात प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव मिळत असल्याने या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. तर एकाच मार्गावरच्या प्रवासात कमी दरात तिकीट उपलब्ध होत असल्याने दिवसाला दीड हजार प्रवाशांची वाढ झाल्याचा अंदाज एनएमएमटीतर्फे वर्तवला जात आहे. एनएमएमटीने या सवलतींचा वर्षाव केल्यामुळे बेस्टच्या प्रवाशांवर पुन्हा काही अंशी परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT