मुंबई

कशेडी घाटातील या धाेक्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक; प्रवाशांच्या जीवाशी खेळ

देवेंद्र दरेकर

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळच्या कशेडी घाटात डोंगराचा भला मोठा कडा आणि काही भाग पुन्हा महामार्गावर कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात दरड कोसळल्याने तब्बल 22 तास हा मार्ग बंद होता. 
कोकणासह गोव्यात जाण्यासाठी मुंबई-गोवा हा मुख्य मार्ग आहे. मात्र, सरकारच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरील विघ्न वर्षांनुवर्षे कायम आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आल्यानंतर रुंदीकरणाचे काम सुरू असले तरी त्याचा वेग मंद आहे. त्यातच आता काही ठिकाणी दरड कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. विशेषत: कशेडी घाटात तर जीवाचा थरकाप होतो. 

हे वाचा : सुशांत सिंग प्रकरणात पोलिसांची बदनामी

9 ऑगस्टला या ठिकाणी डोंगराची कडा मातीसह खाली आल्याने हा महामार्ग तब्बल 22 तासांपेक्षा अधिक काळ बंद होता. प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर येथील काही माती हटवल्यानंतर मार्ग खुला करण्यात आला होता. या घटनेनंतर परिसराची तातडीने पाहणी करत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र 1 महिन्यानंतर दरडीचा काही भाग अद्याप जैसे थे पाहायला मिळत आहे. हा भला मोठा कडा मुसळधार पावसात पाण्यासह खाली येण्याची टांगती तलवार आहे. 

  
कशेडी घाटात डोंगराचा भलामोठा भाग पुन्हा महामार्गावर कोसळण्याची भीती आहे. मोटरसायकलने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो; परंतु प्रशासनाला त्याचे सोयरसुतक नाही, असेच दिसते. 
- नवनाथ पवार, स्थानिक. 
  
मुंबई-गोवा महामार्गावरील दरडीचा शिल्लक भाग काढण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा काही भाग खाली कोसळू शकतो. त्यामुळे महामार्ग दुरुस्ती कामादरम्यान ती दरड बाजूला करण्यात येईल. 
- अमोल महाडकर, प्रभारी उपअभियंता, महामार्ग विभाग. 

(संपादन : नीलेश पाटील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Director Rule : वर्षांनुवर्षे सहकारी बँकेत तळ ठोकलेल्या संचालकांना बसणार दणका! आमदार, खासदारांना फटका

Shreyas Iyer ने दुखापतीनंतर पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल...'

ये है मोहब्बतें मालिकेतील इशिताला व्हायचंय आई! दिव्यांका त्रिपाठी आई होणार? म्हणाली...'लवकरच तुम्हाला गोड बातमी..'

Rishabh Pant: तीन महिन्यांनंतर रिषभ पंतचे आज पुनरागमन; आफ्रिका अ संघाविरुद्ध चार दिवसांचा सामना

Brazil Drug Raid : पोलिसांची ड्रग्ज माफियांवर सर्वात मोठी कारवाई, छाप्यादरम्यान १३० जणांचा मृत्यू; सुप्रीम कोर्टाने अहवाल मागवला

SCROLL FOR NEXT