मुंबई

एप्रिल ते डिसेंबरपर्यंत 500 कॅन्सर अन् कोरोना रुग्णांवर वरळी NSCI डोममध्ये उपचार

भाग्यश्री भुवड

मुंबई: परळच्या टाटा कर्करोग रुग्णालयातून कर्करोग आणि कोरोना अशा दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या 510 रुग्णांना आतापर्यंत एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये उपचार देण्यात आले आहे. त्यातून जवळपास सर्वच्या सर्व यशस्वीरित्या बरे झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे वरळी एनएससीआय डोममध्ये कोविड बाधित एकही कर्करुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे कोणताही गंभीर आजार असला तरी योग्यवेळी उपचार मिळाल्यास कोरोना बाधित रुग्ण बरा होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोरोनाचा सामना करताना विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा कॅन्सर, डायबेटीस, ह्रदयविकार यांसारख्या सहव्याधी आहेत, त्यांना धोका कोरोनाचा धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळी येथील नॅशनल स्पोर्टस्‌ क्लब ऑफ इंडिया येथे विकसित केलेल्या डोम कोरोना काळजी केंद्रात कर्करुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. 

मुंबईत टाटा स्मृती कर्करोग उपचार रुग्णालयात देशभरातून विविध कर्करोगांनी ग्रस्त नागरिक उपचारांसाठी येतात. कर्करुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती खालावलेली असते. त्यात कोरोनाची देखील लागण झाल्यास त्यांच्या जीवाला मोठा धोका असतो. त्यामुळे, टाटा रुग्णालयातील कोविड बाधित कर्करुग्णांना डोम कोरोना केंद्रामध्ये आणून उपचार केले जात आहेत.

550 जणांवर यशस्वी उपचार

टाटा रुग्णालयातून एनएससीआय डोम कोरोना केंद्रामध्ये आलेल्या कोविड बाधित कर्करुग्णांमध्ये अवघ्या दोन वर्ष वयाच्या चिमुरड्यापासून ते 77 वर्ष वयापर्यंतच्या वृद्ध रुग्णाचा समावेश आहे. देशातील जवळपास सर्व भागातून आलेल्या रुग्णांचा यात समावेश आहे. 550 एकूण कोरोना रुग्णांमध्ये जवळपास 40 नातेवाईक होते. कर्करोगग्रस्तांसोबत अनेकदा त्यांचे नातेवाईकही असतात. त्यातून त्यांनाही कोरोनाचा संसर्ग होतो. त्यामुळे त्यांच्यावर ही उपचार केले गेले आहेत. 

डोममध्ये एक ही मृत्यू नाही

सुदैवाने वरळी एनएससीआय डोममध्ये आतापर्यंत कोरोनासह कर्करोगावर उपचार घेणाऱ्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली आहे असे वरळी एनएससीआय केंद्राचे कर्करोग कॉर्डिनेटर डॉ. याग्निक वाझा यांनी सांगितले आहे. 

एनएससीआयचे कर्करोग केंद्र आजपासून बंद 

दरम्यान, मुंबईतील रुग्ण कमी झाल्याने वरळी एनएससीआय डोममध्ये टाटा मेमोरियल रुग्णालयासह सुरू केलेले कर्करोग केंद्र आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जर भविष्यात पुन्हा गरज पडल्यास ते तात्काळ तशाच सेवांसह सुरु केले जाईल. महाराष्ट्रासह इतर 14 ते 15 राज्यातून ही रुग्ण येत होते. बांग्लादेशच्या चार रुग्णांवर ही आपल्या येथे उपचार केले गेले. पण, आता ही संख्या कमी झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढलेच तर मार्चपर्यंत एनएससीआय डोम सुरुच राहणार आहे असे ही डॉ. वाझा यांनी स्पष्ट केले आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Treatment of 500 cancer and corona patients at Worli NSCI Dome from April to December

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT