nair hospital 
मुंबई

कोरोना रुग्णांचं होणार समुपदेशन; नायर रुग्णालयात हेल्पलाइन सुरू

खचलेल्या मनाला आधाराचा प्रयत्न

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनाग्रस्तांच्या (corona patients ) संख्येत होत असलेली वाढ पाहता देशातील प्रत्येक जण हवालदिल झाला आहे. त्यात सतत विचार, भीती, दडपण यामुळे अनेक जण सध्या मानसिक समस्यांना समोरे जात आहेत. विशेष म्हणजे, अनेक कोविड रुग्ण सध्याच्या काळात मानसिक समस्यांनी त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहेत. म्हणूनच कोरोनाग्रस्तांचं समुपदेशन करणे अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात घेत मुंबईतील बी.वाय.एल. नायर रुग्णालयात लवकरच मानसिक आरोग्य हेल्पलाइन (helpline number ) सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोविड रुग्ण (corona patients ) व त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणारं नायर हे पहिलं पालिका रुग्णालय ठरलं आहे. (treatment helpline number for corona patients with psychiatric support at nair hospital)

नायर रुग्णालयाच्या मानसशास्त्र विभागाद्वारे कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे मनोधैर्य वाढवणार असून रुग्णालयाबाहेरील रुग्णांचे देखील समुपदेशन केले जाणार आहे. नारायणदास मोरबाई बुध्रानी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 8828315805 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला.

कोविड 19 च्या रुग्णांसाठी आणि नातेवाईकांसाठी दररोज सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत समुपदेशन केले जाणार आहे. संस्थेच्या सहा मानसशास्त्रज्ञांद्वारे (psychiatric ) हे समुपदेशन केले जाणार असून रुग्णालयाच्या मानसोपचार टीमकडून त्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे.

“प्रशिक्षणादरम्यान कोविड -19 विषयीचे ज्ञान मिळावे म्हणून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचन साहित्य उपलब्ध करुन दिले जाते. एखाद्या संक्रमित रुग्णाला उपचारांसाठी दाखल करण्यासाठी किंवा कोविड -19 संशयित रूग्णाला तपासणीसाठी (ओपीडी) भेट द्यायची असल्यास ते सल्लामसलतीसाठी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. हा हेल्पलाईन क्रमांक फक्त रुग्णालयातील रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठीच असेल. पण, जर कोणी रुग्णालयाशी संबंधित नसेल आणि त्याने हेल्पलाईनवर कॉल केल्यास मानसोपचार विभागाकडून त्यांना मदत केली जाईल, असं नायर रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. हेनल शाह यांनी सांगितलं.

“दुसर्‍या लाटेमुळे लोकांमध्ये चिंता आणि भीती वाढली आहे. पहिल्या लाटेमध्ये आम्ही एक हेल्पलाइन नंबर सुरू केला होता ज्यातून लोकांना योग्य माहिती दिली जात होती. पण, आता या नवीन हेल्पलाइन क्रमांकामुळे आम्ही केवळ समुपदेशनावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे,” असं संस्थेचे प्रकल्प मॅनेजर तुषार यर्मल यांनी सांगितलं.

प्रशिक्षणानंतर समुपदेशन -

"गुरुवारी सुरु झालेल्या या हेल्पलाईन क्रमांकावर आतापर्यंत चार दिवसांत किमान 10 ते 12 कॉल्स येऊन गेले आहेत. त्यातील किमान 5 ते 6 हे लसीकरण आणि लसीसंदर्भातील होते. 2 ते 4 योग्य समुपदेशनासाठी आले आणि 1 ते 2 ज्यांना रुग्णाला दाखल करुन घ्यायचे होते. अशा अनेक कारणांसाठी या क्रमाकांवर संपर्क करुन माहिती, मार्गदर्शन आणि समुपदेशन करता येणार आहे. एका आठवड्यापूर्वी या संबंधित प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यानंतरच आता आम्ही समुपदेशन करत आहोत. सहा मानसोपचारतज्ज्ञांची टीम यासाठी काम करते आहे. कोविड हेल्प डेस्क ही कार्यरत आहेत", असंही नारायणदास मोरबाई बुध्रानी संस्थेचे मानसोपचार तज्ज्ञ संजीवनी अधिकारी यांनी म्हटलं.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताचं टेन्शन वाढलं! सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियाची कर्णधार करणार पुनरागमन, झळकावली सलग दोन शतकं

Latest Marathi News Live Update : 'लॉज'समोरच पत्नीने केली पतीची धुलाई

BSNL Vacancy 2025 : फ्रेशर्सना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 50 हजारांपर्यंत बेसिक सॅलरी

योगिता सौरभपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्रीचा संसार मोडणार? नवऱ्यापासून राहतेय वेगळी; एकमेकांना अनफॉलोही केलं...

Dhule News : दिवाळीनंतर एसटीचा 'सुपरफास्ट' विक्रम! धुळे विभागातून पुणे-मुंबईसाठी एकाच दिवसात १०९ जादा बस रवाना

SCROLL FOR NEXT