कल्याण : पत्री पुलाला श्रद्धांजली वाहताना स्थानिक नागरिक. (छायाचित्र : ऋषिकेश चौधरी)  
मुंबई

कल्याणमधील जुन्या पत्री पुलाला वाहिली श्रद्धांजली 

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याण-शिळफाटा रोडवरील 104 वर्षे जुना ब्रिटिशकालीन पत्री पूल धोकादायक झाल्याने एक वर्षापूर्वी वाहतुकीसाठी बंद करून तो नंतर पाडण्यात आला. त्या जागी नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार असली, तरी हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना तासन्‌ तास कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

पत्री पुलावरील वाहतूक बंदीच्या निर्णयाला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी आज पत्री पुलाला श्रद्धांजली वाहून सरकारी यंत्रणेचा निषेध नोंदवला. 

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पत्री पूल वाहतुकीला बंद करून तो रेल्वेने 18 नोव्हेंबर 2018 ला पाडला. नवीन पत्री पुलाचे भूमिपूजन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 30 डिसेंबर 2018 ला झाल्यानंतर कामाला गती येणे आवश्‍यक होते. मात्र हे काम सध्या अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने या परिसरामध्ये वाहतूक कोंडीचे बेट निर्माण झाले असून अनेकांना याचा त्रास होत आहे. यात स्थानिक नागरिक, व्यापारीही त्रस्त झाले असून, अनेकांचा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे; तर नोकरदारांना लेटमार्क आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही रखडपट्टी होत आहे. 

पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी स्थानिक नागरिकांनी काही दिवसांपूर्वी "भीक मांगो' आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते; मात्र त्यानंतरही हे काम संथ गतीनेच सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी गुरुवारी पुलाला श्रद्धांजली वाहून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. 


एक वर्षापूर्वी ऑगस्ट महिन्यात हा पूल वाहतुकीला बंद करण्यात आला होता. त्यामुळे प्रथम पुण्यस्मरणदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करून सरकारी यंत्रणेचा निषेध व्यक्त केला. लवकरात लवकर नवीन पुलाचे काम पूर्ण होऊन नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी हे आंदोलन केले. आगामी काळात याकडे लक्ष न दिल्यास आमरण उपोषण करणार. 
- शकील खान, 
स्थानिक नागरिक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

IND vs WI 1st ODI Live: जॉन कॅम्बेल-जस्टीन ग्रीव्ह्स जोडीने इतिहास घडवला; १७ वर्षांनंतर विंडीजच्या ओपनर्सनी मोठा पराक्रम केला

Ashutosh Ranka Detained : गुवाहाटीत आशुतोष रांका ताब्यात; हिमंता बिस्वा सरमांवर अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप, दिला मोठा इशारा

Teacher Success Story: जिद्द, मेहनत अन् कुटुंबाची साथ..; बाबांचे स्वप्न लेकीने उचलले खांद्यावर; ज्योती शेलाराची शिक्षणप्रवासाची प्रेरणादायी कहाणी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT