मुंबई

राज्यातील मत्स्यव्यवसाय वाढीसाठी नाबार्ड व केंद्र शासनाबरोबर त्रिपक्षीय करार

मृणालीनी नानिवडेकर

 मुंबई  : राज्याच्या किनारी भागातील पायाभूत सुविधांचा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पायाभूत सुविधा विकास निधी (Fisheries and Aquaculture Infrastructure Fund - FIDF)’ या योजनेंतर्गत राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने केंद्र शासनाचा मत्स्य व्यवसाय विभाग, राज्य शासनाचा वित्त विभाग आणि नाबार्ड यांच्यासोबत त्रिपक्षीय करार केला आहे. मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधानसचिव श्री. अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या करारामुळे मत्स्य व्यवसाय वाढीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास चालना मिळाली आहे.

या त्रिपक्षीय करारावर राज्य शासनाच्या वित्त विभागाचे सचिव श्री. राजीव मित्तल तर नाबार्डचे मुख्य व्यवस्थापक श्री. एल. एल. रावळ यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्रधान सचिव (पदुम) श्री. अनूप कुमार व मत्स्यव्यवसाय आयुक्त  अतुल पाटणे उपस्थित होते.  या योजनेतून मत्स्यव्यवसाय विभागाच्या सागरी भागांमध्ये विविध सोईसुविधा पुरविण्यासाठी मत्स्यबंदरे उभारणे, जेट्टी बांधणे, बर्फ कारखाना स्थापन करणे, शीतगृहे उभारणे, मासळी मार्केटचे आधुनिकीकरण करणे, मत्स्यबीज बँक तयार करणे इत्यादी 20 प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यासाठी शासन स्वत:चेच प्रकल्प राबविणार आहे. ही योजना सन 2022-23 या वर्षापर्यंत राबविण्यात येणार आहे.

Triparty Agreement with NABARD and Central Government for Fisheries Growth in the State

-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT