मुंबई

ट्रिपल तलाक कायद्यानुसार नवी मुंबईत दुसरा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई :  ट्रिपल तलाक दिल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह सासू, दीर व जाऊ या चौघांवर छळवणुकीसह मुस्लिम महिला बाल हक्क संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईत या कायद्यानुसार हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून यापूर्वी खारघरमध्ये या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वाशी सेक्‍टर- 15 मध्ये राहणारी 28 वर्षीय तक्रारदार विवाहिता मागील तीन वर्षांपासून अंबरनाथ येथे माहेरी राहावयास आहे. तिचा निकाह जून 2014 मध्ये मुदस्सर बेग याच्याशी मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता. लग्नानंतर विवाहिता वाशी येथे पतीच्या घरी आल्यानंतर तिचा पती, सासू, दीर व जाऊ यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिला माहेरहून 10 लाख रुपये घेऊन ये अन्यथा घरातून निघून जा असेदेखील धमकावले.

पीडित विवाहितेच्या बाळंतपणाचा 55 हजार रुपये खर्चदेखील तिच्या आईकडून घेण्यास भाग पाडल्याचे पीडित विवाहितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पती व सासरकडील मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहिता तीन वर्षांपूर्वी आपल्या माहेरी निघून गेल्यानंतर पती मुदस्सर अब्दुल सत्तार बेग याने गेल्या मार्च महिन्यात फोनवरून विवाहितेला बेकायदापणे घटस्फोट दिला. त्यानंतर पती मुदस्सर याने पीडित विवाहितेला नोटीससुद्धा पाठवून दिल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. 
 

पीडित विवाहितेच्या पतीला उल्हासनगर येथील महिला निवारण कक्षामध्ये बोलावून त्याचे समुपदेशनदेखील करण्यात आले; मात्र त्यानंतरदेखील त्याने तिला नांदवण्यास नकार दिला. त्यामुळे या विवाहितेने अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अंबरनाथ पोलिसांनी विवाहितेचा पती मुदस्सर अब्दुल सत्तार बेग, सासू नसिम बानू अब्दुल सत्तार बेग, दीर मोहम्मद अब्दुल सत्तार बेग व त्याची पत्नी आसमा मोहम्मद बेग या चौघांवर छळवणूक, धमकावणे, मारहाण करणे, त्याचप्रमाणे मुस्लिम महिला बाल हक्क संरक्षण कायदा-19 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


आद्याप कुणाला अटक नाही  

सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी वाशी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे वाशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT