मुंबई

Fake TRP Case: मुख्य आरोपी पार्थो दासगुप्तांना हायकोर्टाचा दिलासा

- सुनीता महामुणकर

मुंबई: फेक टीआरपी प्रकरणातील आरोपी पार्थो दासगुप्ता यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जमीन मंजूर केला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

दासगुप्ता यांना न्या पी डी नाईक यांनी दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच तेवढ्याच रकमेचे दोन हमीदार दाखल करण्याचे निर्देश दिले. पुढील सहा आठवड्यात हमीदार दाखल करायचे असून तोपर्यंत कॅश बॉन्ड देण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. तसेच पारपत्र मुंबई पोलिसांकडे सुपुर्द करावे आणि देशाबाहेर जाऊ नये, असे आदेश दिले. 

दर महिन्यात पहिल्या शनिवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, त्यानंतर सहा महिन्यांनी ही हजेरी तीन महिन्यात एकदा द्यावी असेही आदेश दिले. खटल्याला नियमित हजेरी लावावी, तपास प्रभावित करु नये, अशा शर्ती न्यायालयाने दिल्या आहेत.

फेक टीआरपी प्रकरणात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कॉन्सिलचे माजी सीईओ असलेले दासगुप्ता यांनी रिपब्लिक टीव्हीला हितकारक ठरेल असे नियमबाह्य निर्णय घेतले असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. या प्रकरणातील अन्य सर्व आरोपी जामिनावर आहेत. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे आणि दासगुप्ता यांचे व्हॉटसअॅप चॅटही लीक झाले आहे.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

TRP scam case Bombay High Court grants bail to Partho Dasgupta

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BJP Candidate List : भाजप उमेदवारांच्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त; शिवसेनेसोबत जागावाटप अजूनही अनिश्चित!

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

SCROLL FOR NEXT