मुंबई

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, अर्णब गोस्वामीला अटक करायची असेल तर आधी...

पूजा विचारे

मुंबई: टीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णब गोस्वामींना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. रिपब्लिक टिव्ही आणि एआरजी आऊटलायर मीडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अटकेसाठी कोणतीही कठोर कारवाई करण्यापूर्वी पोलिसांना 72 तासांची नोटीस स्पष्ट द्यावी लागेल, असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं असे अंतरिम आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. पोलिस त्यांना हवे त्या प्रमाणे तपास करू शकतात, असंही न्यायालयानं सांगितलं आहे. मात्र पण अटक करायची झाल्यास 72 तासांची आगाऊ नोटीस द्यावी लागेल, असं म्हटलं आहे. 

रिपब्लिकच्या मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि एआरजीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करायची असल्यास त्यांना 72 तासांची आगाऊ नोटीस द्यावी लागेल, असं न्यायालयानं म्हटलं. न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि मनीष पितळे यांच्या खंडपीठाने असे अंतरिम आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. तर  पोलिस आपला तपास हा 12 आठवड्यात पूर्ण करतील अशी हमी सरकारी वकिल दिपक ठाकरे यांनी पोलिसांतर्फे न्यायालयात दिली. यानंतर खंडपीठाने हे अंतरिम आदेश दिलेत.  या याचिकेवर पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे. 

फेक टीआरपी गैरव्यवहार प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी रिपब्लिक आणि गोस्वामी यांच्या वतीने याचिका करण्यात आली आहे. हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे. 

१७ तारखेला झालेल्या सुनावणीत अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा केला जात आहे, मग एफआयआर आणि आरोपपत्रात त्यांचा उल्लेख का केला नाही,  त्यांच्या विरोधात कधीपर्यंत तपास करणार आहात असे थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना केले होते. 

TRP scam case Bombay High Court Mumbai Police Give three days prior notice Arnab Goswami

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT