मुंबई

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर अपघात; एकाचा जागीच मृत्यू

विजय गायकवाड

नालासोपारा -  मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार जवळ दुचाकी व ट्रक मध्ये आज सकाळी 9 च्या सुमारास हा अपघात झाला  आहे.  या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असून त्याला मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे .

सुरज सुनील हरणे (वय 22) असे मयत झालेल्या युवकाचे नाव असून, सागर सुनील हरणे  (वय 24) असे जखमी चे नाव आहे. हे दोघे भाऊ असून विरार पूर्व काशीद कोपर येथील रहिवासी आहेत. हे दोघे कशिद कोपर वरून सातिवली येथे कामावर जात असताना महामार्गावरील पेल्हार फाटा या ठिकाणी अपघात झाला आहे. पेल्हार येथे पहिल्या लेनवर बंद ट्रक दुरुस्तीसाठी उभा होता यावेळी भरवेगात आलेल्या दुचाकीस्वारांनी ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघात बाईकचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून अपघात वाचलेल्या जखमीला उपचारासाठी हलविले.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT