मुंबई

जव्हारमध्ये ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वार जळून खाक

भगवान खैरनार

मुंबईः  विक्रमगड रस्त्यावर कासटवाडी जवळच्या वळणावर ट्रक आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला आहे. शनिवारी हा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी ट्रक खाली गेली आणि तिने पेट घेतला. त्यामुळे दुचाकीस्वार अजय वाढू (28 ) याचा जागीच जळून मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झालीत.

अपघाताबाबत समजलेल्या माहिती नुसार, कुतुरविहीर येथील अजय वाढू हा आपल्या भावाला आणण्यासाठी विक्रमगडला जात होता. विक्रमगडहून जव्हारकडे येणारा ट्रक यांचा कासटवाडी जवळच्या वळणावर अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की दुचाकीस्वार ट्रकखाली गेला. त्यामुळे पेट्रोलचा भडका उडून दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या अपघातात दुचाकीस्वार अजय विष्णू वाढू हा जागीच जळून ठार झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच, जव्हार नगरपरिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळी लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र, तो पर्यत वाहने संपूर्ण जळून खाक झाली होती. याच वळणावर आतापर्यंत अनेक अपघात होऊन निरपराधांचे जीव गेले आहेत. येथे उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा मागणी करूनही त्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अपघातांची मालिका सुरू असून प्रवाशांच्या मृत्यूचे तांडव सुरूच आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झालेत.

-------------------

(संपादनः पूजा विचारे)

Truck and two wheeler accident Jawahar two Vehicles burnt 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

२ वर्ष चांगली चालली अन् वाहिनीने अचानक बंद केली लोकप्रिय मालिका; प्रेक्षक संतापले, म्हणतात- काय मूर्खपणा...

Latest Marathi News Updates : पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्काराचा निर्णय बदलला? खेळाडूंनी सोडलं हॉटेल

Nepalese Jhol Momo Recipe: झणझणीत, आंबट आणि शेंगदाण्याच्या चवीचे, नेपाळचे खास झोल मोमो एकदा नक्की ट्राय करा

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT