मुंबई

राज्यभरात आजपासून क्षय, कुष्ठरुग्ण शोध अभियान; आठ कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी होणार

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात "संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियान' मंगळवार, 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत राबविले जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील सुमारे 8 कोटी 66 लाख 25 हजार 230 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

ग्रामीण भागातील 6 कोटी 82 लाख 23 हजार 398 आणि शहरी भागातील 1 कोटी 84 लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. रोग शास्त्रीय अभ्यासानुसार क्षय आणि कुष्ठरोगाचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास त्यांना आरोग्यविषयक अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्याचसोबत त्यांच्या सहवासातील इतर निरोगी लोकांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध आणि त्यांच्यावर उपचार करण्याकरिता 1 डिसेंबरपासून घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. 
दरम्यान, नुकताच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मोहिमेसाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती; तर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती नेमण्यात आली आहे. पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. घरी येणाऱ्या पथकास तपासणीसाठी सहकार्य करून नागरिकांनी मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केले. 

औषधोपचार मोफत! 
सर्वेक्षण पथकात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील सर्व घरांचे; तर शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रोगनिदान झाल्यास संपूर्ण औषधोपचार मोफत करणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले

Tuberculosis, leprosy research campaign across the state from today More than eight crore citizens will be investigated

-----------------------------------------------------------

( संपादन  - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT