Tushar Gandhi  sakal
मुंबई

Tushar Gandhi : भारत जोडो यात्रेचे यश राहूल गांधी यांचे; तुषार गांधी

पक्ष संधीचा फायदा कसे घेते यावर यश अवलंबून महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी व्यक्त केले मत

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - भारत जोडो यात्रा हा खूप आवश्यक असा उपक्रम होता. त्या माध्यमातून चांगला संदेश समाजात पोहोचला आहे. या संधीचा फायदा पक्ष कशाप्रकारे पुढे उपक्रम राबवित निवडणूकीत करुन घेतो त्यावर पुढील निकाल अवलंबून असेल.

कारण भारत जोडो यात्रेचे बेनिफिट्स सर्व राहूल गांधी यांना जाते आणि ते व्हायला पाहीजे. या यात्रेतून जरुरी असा संदेश त्यांनी देशाला दिला आहे. देशातील जनता कसे सहकार्य करते आणि पार्टी त्यांना कसे पुढे घेऊन जाते त्यावर पुढील भवितव्य अवलंबून असेल असे मत महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी डोंबिवलीत मांडले.

डोंबिवलीत हेल्पिंग हॅन्ड या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमास रविवारी तुषार गांधी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता भारत जोडो यात्रेविषयी आपले वरील मत त्यांनी व्यक्त केले.

भारतीय चलनावर महात्मा गांधी नसावेत असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे. याविषयी ते म्हणाले, भारतीय चलनाचा ज्याप्रकारे वापर होतो तो गांधी यांच्या तत्वाविरोधात आहे. आज पैशाचा फायदा हा श्रीमंतांना होत आहे, गरिबांना नाही. म्हणून चलनावर गांधी नसावेत असे माझे मत असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ही मोहीम राबविली होती त्याचा खरपूस समाचार तुषार गांधी यांनी घेत म्हटले, राष्ट्रभक्तीचा हा एक दंभपणा आहे. एकदिवस तिरंगा ठेवायचा आणि मग त्या तिरंग्याची काय अवस्था होते त्याकडेही कोणी पहात नाही.

त्यापेक्षा आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या कार्यात, आपल्या जीवनामध्ये आपण देशाचे हित कसे करतो, नुकसान काय करतो याची जाणीव असणे हीच प्रखर राष्ट्रभक्ती आहे असे मला वाटते असे ते म्हणाले.

अदानी यांच्या संदर्भात विचारले असता गांधी म्हणाले, जर या देशात न्यायतंत्र असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे याचा विचार करुन भारताच्या न्यायाप्रमाणे त्याच्याबरोबर वागायला पाहिजे. ते आपोआप व्हायला पाहीजे.

सरकारवर आपण टिका करत बसलो तर त्याचा अर्थ नाही. आपल्याकडे स्वतंत्र न्यायप्रणाली आहे, त्यांनी आपली स्वतंत्रता दाखविण्यासाठी जर याच्यात त्यांना गुन्हाय प्रवृत्ती दिसत असेल तर त्याच्यावर कारवाई केली गेली पाहीजे.

तर पुतळ्यावरून सुरु असलेल्या राजकारणावर बोलताना त्यांनी पुतळ्याच्या राजनीती मध्ये थोडे देखील स्वारस्य नसल्याचे म्हटले. कारण पुतळे बनवणारा आणि ते लावणारा आपला अहंकार प्रदर्शित करण्यासाठी पुतळ्याचे राजकारण करत असतात. ज्यांची प्रतिमा लावली जाते त्याना त्याचा काहीच फरक पडत नाही.

तर महापुरुषांवर केल्या जाणाऱ्या टीकेवर बोलताना गांधी म्हणाले, ही फार हिन प्रवृत्ती आहे. सगळ्यांनी आपआपले महापुरुष वाटून घेतले आहेत. म्हणून दुसऱ्यांच्या महापुरुषांवर टिका करणे आणि स्वतःच्या महापुरुषांची स्तुती करणे हे महापुरुषांबद्दल अन्याय करत आहोत. त्याच्यात भक्तीही नाही आणि टिका करतात त्यातही काही तथ्य नाही असे मला वाटते.

फक्त एक राजनितीक प्रकार यात दिसतो. राजकारणी लोकांची ही स्ट्रॅटेजी आहे कारण जे खरे प्रश्न आहेत त्याकडे त्यांचे लक्ष नाही. हे त्यांना करावे लागते कारण, त्यांनी सामान्य माणसाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याकडे कधी लक्ष दिले नाही. सामान्य माणसाचे लक्ष दुसरीकडे ओढून घेण्यासाठी त्यांना अशा प्रकारे इतर मुद्द्यांचा आधार घ्यावा लागतो असे गांधी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT