मुंबई

उरी स्टाइल ट्विट करत मुंबई पोलिस विचारतायत 'हाऊज द...' 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहे. अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, पोलीस, नर्सेस अहोरात्र मेहनत घेताहेत. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणे तसंच सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे महत्त्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी एक भन्नाट ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये पोलिसांनी उरी: द सर्जिकल स्ट्राइक या सिनेमातील एका डायलॉगचा वापर केला आहे. 

अभिनेता विकी कौशलचा उरी: द सर्जिकल स्ट्राइक या सिनेमानं लोकांमध्ये बरीच क्रेझ निर्माण केली होती. या सिनेमातील हाऊज द जोश हा डायलॉग बराच प्रसिद्ध झाला होता. हाच संदर्भ घेऊन मुंबई पोलिसांनीही ट्विट केलं आहे. 

या डायलॉगचा आधार घेत, त्यात थोडासा ट्विस्ट करुन मुंबई पोलिसांनी नागरिकांना 'हाऊज द डिस्टन्स?' अशी विचारणा केली आहे. पोलिसांनी विकी कौशलचा फोटो शेअर करत 'हाऊज द डिस्टन्स' असं कॅप्शन दिलं आहे. 

पण पोलिसांना विकी कौशलचा हा फोटो एडिट केला आहे. या फोटोत त्याच्या तोंडाला मास्क लावण्यात आला आहे आणि त्यात 'सहा फिट सर' असं फोटोखाली लिहिण्यात आलं आहे. बॉलिवूड सिनेमातील या प्रसिद्ध डायलॉगचा उत्तमरित्या वापर करुन मुंबई पोलिसांनी चांगली जनजागृती केली आहे. 

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी सहा फूट अंतराचं नियम पाळायला विसरु नका असा संदेश दिला आहे. मुंबई पोलिस नेहमीच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अशा पद्धतीचे रंजक पोस्ट करून नागरिकांमध्ये जनजागृती करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT