corona vaccination sakal media
मुंबई

मुंबई : १२ ते १४ वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनापासून बचाव (corona pandemic) होण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण (corona vaccination) करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत १४ वर्षांपुढील वयोगटापर्यंत लसीकरण झाल्यानंतर आजपासून (ता. १६) १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. यानिमित्त राज्यात ६४ लाख; तर मुंबईत (Mumbai) जवळपास पाच लाखांहून अधिक लहान मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी (children vaccination) राज्याला ४० लाख डोस मिळाले असून त्यातून ६४ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

आजपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेत मुलांना ‘कॉर्बेव्हॅक्स’ ही लस टोचली जाणार आहे. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी लशीचा दुसरा डोस दिला जाईल. दरम्यान, राज्यात कुठे आणि कसे लसीकरण केले जाईल याबाबतची माहिती कोविन ॲपवर अपडेट केली जाणार असल्याचे राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.

सुरुवातीला १२ केंद्रांवर सुविधा

१२ ते १४ या वयोगटातील लाभार्थ्‍यांच्या लसीकरणासाठी सुरुवातीला मुंबईतील १२ केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. सुरुवातीचे दोन दिवस प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण केले जाईल. लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यानंतर सर्वच केंद्रांवर लसीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिकेकडून विविध शाळा, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळे आदींचेही सहकार्य घेतले जाणार आहे.

लसीकरण केंद्रांची यादी

ई विभाग- टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर धर्मादाय रुग्णालय, मुंबई सेंट्रल
ई विभाग- ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे जे समूह रुग्णालय, नागपाडा, मुंबई सेंट्रल
एफ उत्तर विभाग- लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय, शीव (पूर्व)

एफ दक्षिण- केईएम रुग्णालय, परळ
एच पूर्व- वांद्रे-कुर्ला संकुल जम्बो कोविड लसीकरण केंद्र
के पूर्व- सेवन हिल्स रुग्णालय, वांद्रे (पूर्व)
के पश्चिम- डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम)
पी दक्षिण- नेस्को जंबो कोविड लसीकरण केंद्र, गोरेगाव (पूर्व)
आर दक्षिण- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालय, कांदिवली (पश्चिम)
एन विभाग- राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व)
एम पूर्व विभाग- पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालय (शताब्दी रुग्णालय), गोवंडी
टी विभाग- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रुग्णालय, मुलुंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT