मुंबई

मायबाप सरकार लक्ष देणार का? तब्बल 25लाख ट्रकचालकांची होतेय उपासमार!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यावश्‍यक सेवा पुरवणारे सुमारे 25 लाख ट्रकचालक रस्त्यांवर अडकले आहेत. औषधे व वैद्यकीय साधनसामग्रीची वाहतूक करणाऱ्या या ट्रकचालकांना परतीच्या प्रवासासाठी मनाई करण्यात आल्याने रस्त्यावर एकाच ठिकाणी थांबावे लागले आहे. त्यामुळे या ट्रकचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

बिहारमधील ट्रकचालक दिनेश शहा लॉकडाऊन सुरू झाल्यापासून गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात महामार्ग क्र. 8 वर अडकले आहे. ढाबे बंद असल्यामुळे जेवण मिळत नाही; त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी जादा पैसे मोजून काही भांडी विकत घ्यावी लागली. अन्नधान्य, भाजीपाला महागला असून, जीवनावश्‍यक वस्त्‌ूंची दुकाने बंद आहेत. त्यामुळे फारच बिकट अवस्था झाली आहे, असे त्यांनी दूरध्वनीवरून सांगितले.

निर्जंतुकीकरणाची सुविधा हवी 
सध्या जीवनावश्‍यक पुरवठा करणारे ट्रक रस्त्यांवर धावत आहेत. कोरोनाच्या संसर्गाची भीती असतानाही हे ट्रकचालक अत्यावश्‍यक सेवा देत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गांवर वाहनांच्या निर्जंतुकीकरणासाठी व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे ट्रकचालकांची थर्मल तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC च्या गाजावाज्याच्या पलीकडे 'मूक क्रांती'ची जादू! बंगालच्या राजकारणात RSS च्या ‘नि:शब्द रणनीती’ने कसा इतिहास घडवला?

Election Results 2026 : तृणमूलची १५ वर्षांची सत्ता उलथवली, केरलममध्ये डावे सत्ताबाहेर, पाच राज्याच्या निकालानंतर किती राज्यात भाजपाची सत्ता?

Gokul Milk Administrative Committee : आदेश आला! अखेर गोकुळ दूध संघावर प्रशासकीय अधिकारी मंडळाची नियुक्ती, ५ सदस्यीय मंडळाच्या हातात गोकुळचा कारभार

Childhood Diabetes Management: बालमधुमेहावर केंद्राचा मोठा निर्णय; पहिली राष्ट्रीय नियमावली केली जाहीर!

Mumbai News: भविष्याचा विचार करून भरपाई द्या! न्यायालयाचे ‘मॅक्ट’ला आदेश

SCROLL FOR NEXT