मुंबई

#VIDEO: टिकटॉवरची ‘शानपट्टी’अंगलट आली ; पोलिसांनी घडवली अद्दल

सकाळ वृत्तसेवा

मुंबईः टीकटॉकचे व्ह्यूज वाढवण्यासाठी पोलिसांची मस्करी करणारा व्हिडिओ दोन टीकटॉक स्टार्सला महागात पडला. पोलिसांनी संचारबंदीचा कायदा मोडल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
मोहम्मद हसन युसुफ शेख (24), असिफ रशीद शेख (19) असे अटक आरोपींची नावे आहेत.  यातील मोहम्मद हा पायधुनी परिसरात राहण्यास असून आसिफ हा डोंगरी परिसरात राहण्यास आहे. हे दोघे टिकटॉक स्टार असून या दोघांचे हजारो फॉलोअर्स आहेत.

हसनशेख  व त्याचा साथीदार बॉलीवूड स्टाईलमध्ये पोलिसांमध्ये डायलॉगबाजी करून पोलिसांची मस्करी उडवत होते. त्यांचे ऑनलाईन फॉलोअर्स खूप असल्यामुळे हा व्हिडिओ खुप वायरल झाला. पण हा वायरल व्हिडिओ जेव्हा पोलिसांच्या हाती आला. त्यानंतर या टिकटॉक स्टार्सवर तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी चांगलीच त्यांची घरापासून वरात काढली. आता आपण केलेला व्हिडीओ कसा चुकीचा होता? हे सांगत आणि त्याचबरोबर पोलिसांची माफी मागत दोघेही फिरत आहेत.

दोघांना अटक करण्यात आल्यानंतर या दोघांनी पोलिसांकडे माफी मागून या पुढे कधीच व्हिडीओ तयार करून व्हायरल करणार नसल्याची कबुली दिली. या दोघांनी माफी मगितल्याचा व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल झाला असून पोलिसानी या टिकटॉक स्टारवर कारवाई करून दोघांची चांगलीच जिरवली आहे. डोंगरीच्या या युवकांना त्यांची शानपट्टी भलतीच महाग पडली आहे, आता असा व्हिडिओ कोणीही बनवू नका, असे सांगत फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.डोंगरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी या दोघांच्याही अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  या दोघांचेही टिकटॉकवर अनेक फॉलोअर्स आहेत. यापूर्वीही बॉलीवूड स्टाईममध्ये अनेक व्हिडीओ त्यांनी बनवले आहेत. पण लॉकडाऊनमध्ये केलेला हा व्हिडिओ जन्मभर त्यांच्या लक्षात राहिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: आक्रमक होणारच! IND vs PAK सामन्याआधी भारताचा कर्णधार सूर्यकुमार अन् पाकिस्तानी सलमान आघाने फुंकले रणशिंग

Mumbai: नौदल संकुलातून रायफल-दारूगोळा चोरी, मुंबईतील घटना, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Mahila Kisan Yojana: महिला किसान योजनेचे लाभार्थी कोण? आजच जाणून घ्या याचे फायदे!

Mumbai Accident: वरळी सी-लिंक कोस्टल रोडवर अपघात, पोलिसाचा मृत्यू

Viral Video : चोरी करायला आला पण चोरावरच डाव उलटला, महिलेने शिकवला कायमचा धडा; व्हिडिओ पाहून वाटेल आश्चर्य

SCROLL FOR NEXT