मुंबई

साथीच्या आजाराने एकाच कुटुंबातील दोन मुलींचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : तालुक्‍यातील कुंडाचापाडा येथे गेल्या आठवडभरापासून तापाची साथ आली असून या साथीमुळे एकाच कुटुंबातील सावित्री आणि माधुरी अशा दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या मृत्यूंमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या मुलींच्या मृत्यूचे कारण सरकारी यंत्रणा असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थ करत आहेत.

मोखाड्यातील कुंडाचा पाडा या 716 लोकसंख्या असलेल्या गावात मागील आठवडाभरापासून तापाची साथ पसरली होती. भरपूर प्रमाणात रुग्ण आरोग्य केंद्रात येत असतानाही इतके रुग्ण का येत आहेत, असा प्रश्‍नही प्रशासनाला पडला नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारच्या ढिसाळ कारभाराचा गोविंद कुटुंबाला मोठा तोटा झाला असून आधी 11 ऑगस्ट रोजी सावित्री राजु गोविंद (6) हिचा मृत्यू झाला; तर त्यापाठोपाठ 13 ऑगस्ट रोजी तिचीच चुलत बहीण माधुरी नवश्‍या गोविंद (11) हिचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनांमुळे सर्व गावात भीती पसरली असून अनेकांनी आपली लहान मुले नातेवाईकांकडे पाठवली आहेत. दरम्यान, सध्या कुंडाचा पाडा येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले असून दररोज सर्वेक्षण करण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकारी किशोर देसले यांनी दिल्या आहेत. 

सावित्री ठरली सरकारी अनास्थेची बळी... 

या संपूर्ण प्रकरणात सहा वर्षीय सावित्री ही सरकारी अनास्थेची बळी ठरली आहे. कारण 10 ऑगस्ट रोजी सावित्रा ही तापाने फणफणत होती. त्या दिवशी तिच्या पालकांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रांत नेले. मात्र प्रकृती नाजूक असल्याने तिला ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे पाठविण्यात आले. त्या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू केले गेले. मात्र तरीही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला पुढे जव्हार कुटीर रुग्णालयात हलविणे गरजेचे होते. परंतु रात्री 8 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत रुग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही. यामुळे अखेर रुग्णवाहिकेची वाट न पाहता, खासगी वाहन करून सावित्री आणि पालक राजू गोविंद यांनी जव्हार कुटीर रुग्णालय गाठले; मात्र तिथे जाण्याच्या दरम्यान सावित्राचा मृत्यू झाला. यामुळे तिला ताप आल्यापासून ते जव्हार कुटीर रुग्णालय गाठेपर्यंत रुग्णवाहिका न मिळाल्याने सावित्राचा जीव गेल्याने सरकारी यंत्रणेनेच तिचा बळी घेतल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. 



मी स्वतः कुंडाचा पाडा येथे जाऊन आलो असून ही घटना दुर्दैवी आहे. येथील वैद्यकीय अधिकारी संतोष बिरारी यांच्याविरोधात प्रचंड तक्रारी येथील ग्रामस्थांच्या आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असून येथील साथ आटोक्‍यात येईपर्यंत कॅम्प चालू ठेवण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. 
- प्रदीप वाघ 
सभापती, मोखाडा 


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT