मुंबईत कोरोनामुळे आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू  
मुंबई

मुंबईत कोरोनामुळे आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाविरोधी लढ्यात जिवाची पर्वा न करता अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई पोलिस दलातील आणखी दोन अधिकाऱ्यांचा या विषाणूने बळी घेतला. कोरोनाने आतापर्यंत मुंबई पोलिस दलातील आठ जणांचा, राज्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 

शाहूनगर पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक आणि मोटार परिवहन विभागातील सहायक उपनिरीक्षकाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. मुंबई पोलिस दलाने ट्‌विटद्वारे ही माहिती दिली असून, या कोरोना योद्‌ध्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शाहूनगर पोलिस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक ताप आणि सर्दीमुळे 3 मेपासून आजारी होते. त्यांची सायन हॉस्पिटलमध्ये 13 मे रोजी कोरोनाची चाचणी झाली होती; त्यानंतर ते घरीच होते. 

शनिवारी पहाटे ते घरातील बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली. त्याच दिवशी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. मोटार परिवहन विभागातील 57 वर्षांचे सहायक पोलिस उपनिरीक्षक 15 दिवसांपासून रजेवर होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Railway Project : महाराष्ट्रात नवा रेल्वे प्रकल्प ! ५,४०० गावांना जोडणारा २३१ किलोमीटरचा रेल्वे मार्ग मंजूर

शाहिद आणि करिना यांचा 20 सेकंदाचा MMS झालेला लीक? त्या व्हिडिओमुळे तुटलं नातं! खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीदरम्यान पत्रकारांवर अन्याय

Go Away... इंग्लंड-पाकिस्तानच्या फॅन्समध्ये जुंपली! लाईव्ह सामन्यात जोरदार भांडणं अन् श्रीलंकेन चाहत्यांची मध्यस्थी; Video Viral

F-16 लढाऊ विमान हायवेवर कोसळलं, उड्डाणानंतर २ मिनिटांनी रडारवरून गायब; दुर्घटनेचा VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT