Two people were arrested in Ulhasnagar Selsman murder case
Two people were arrested in Ulhasnagar Selsman murder case 
मुंबई

उल्हासनगरात सेल्समन हत्या प्रकरणात दोघांना अटक

दिनेश गोगी

उल्हासनगर : तीन चार महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या खुनाचा बदला म्हणून परवा एका सेल्समनची दिवसाढवळ्या गळा चिरुन हत्या केली गेली. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी 19 वर्षाच्या घरात आहेत.

सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास बशिष्ठ यादव हा सेल्समन चा व्यवसाय करणारा तरुण कॅम्प 2 येथील आवतमल चौक झुलेलाल मंदीरसमोरील रोडवरून पायी जात होता. तेव्हा निषाद यांच्या टोळीने यादवला भररस्त्यात गाठले आणि त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करून ठार मारले. मंगळवारी सकाळी यादव कुटुंबियानी बशिष्टचा पार्थिव ताब्यात घेऊन त्यांच्या आझादनगर निवासस्थानी नेला. मात्र जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही,तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमला होता. जनआक्रोश होण्याच्या धास्तीने पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पाटील, धुला टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे, सुधाकर शीघ्र कृती दल असा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 24 तासांच्या आत आरोपींना बेडया ठोकण्यात येणार, असे आश्वासन पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी दिल्यावर बशिष्ठ याच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार करण्यात आले.

बशिष्ठ यादव याचा चुलत भाऊ बिपिन यादव याने सुंदरम निषाद याचा खून केला होता. त्या पूर्व वैमन्स्यातून निषाद टोळीने बशिष्ठ यादव याचा खून केला. या खुनामागे प्रामुख्याने संदिप निषाद व नूर अंसारी ही नावे समोर आल्यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जावळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन तडाके, उपनिरीक्षक संतोष म्हस्के, गुन्हे शोध प्रकटीकरणचे वसंत डोळे, अर्जुन मुत्तलगीरी, मिलिंद बोरसे, पी. एन. आव्हाड यांनी तपासाचे जाळे पसरवून संदिप निषाद, नूर अंसारी या दोघांना काल रात्री उशीराने शहाड पुलाखाली अटक करण्यात आली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT