Accident Sakal
मुंबई

Accident : ओला कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांतून पडणाऱ्या द्रवामुळे दुचाकींचा अपघात

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ओला कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांतून रस्त्यावर सांडणाऱ्या द्रव्यामुळे दुचाकींचे अपघात होत आहेत.

शर्मिला वाळुंज

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ओला कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांतून रस्त्यावर सांडणाऱ्या द्रव्यामुळे दुचाकींचे अपघात होत आहेत.

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ओला कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांतून रस्त्यावर सांडणाऱ्या द्रव्यामुळे दुचाकींचे अपघात होत आहेत. बुधवारी सकाळी ठाकुर्ली येथील 90 फिट रोडवर सांडलेल्या चिकट द्रव्यावरून घसरून एक दुचाकीस्वराचा अपघात घडला आहे. यात त्याच्या हाता पायाला जखमा झाल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून ओला व सुका कचरा वेगवेगळा वाहून नेला जातो. ओला कचरा वाहून नेणाऱ्या कचरा गाड्या या जुन्या झाल्या असून ओला कचऱ्यातून निथळणारे पाणी चिकट द्रव्य स्वरूपात स्रावते. हे पाणी रस्त्यावर सांडत असल्याने त्यावरून दुचाकी गाड्या घसरून अपघात घडत आहेत. बुधवारी सकाळी 90 फिट रोडवरून कचरा वाहून नेणारी गाडी गेली होती. त्यातून चिकट द्रव्य रस्त्यावर सांडलेले असल्याने दुचाकीस्वार घसरून त्याच्या हातापायाला दुखापत झाली.

याआधी ही कल्याण डोंबिवली परिसरात असे अनेक दुचाकीस्वारांचे अपघात रस्त्यावर सांडलेल्या चिकट द्रव्यामुळे झाले आहेत. पालिका प्रशासनाच्या निदर्शनास येऊन देखील प्रशासन त्याकडे गांभीर्याने पहात नसल्याचे दिसते.

यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन अधिकारी अतुल पाटील यांना विचारणा केली असता या संदर्भात जुन्या गाड्या बदलून या ठिकाणी नवीन गाड्या लवकरच येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT