mumbai sakal
मुंबई

महामार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

नादुरुस्त कंटेनरला दुचाकीने धडक दिल्याने झाला अपघात

नाविद शेख

मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गावर नादुरुस्त कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (ता.16)रात्री दहा वाजताच्या सुमारास सातीवली गावच्या हद्दीत गुजरात मार्गिकेवर हा अपघात झाला होता.एस आर सोमसेक्रिया (वय.52)असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून तो डहाणूचा रहिवासी होता.नादुरुस्त वाहने महामार्गावरून हटविण्यात महामार्गाची कंत्राटदार कंपनीकडून होत असलेले दुर्लक्ष दुचाकीस्वारांच्या जीवावर बेतत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सातीवली गावच्या वळणावर महामार्गाच्या गुजरात वाहिनीवर नादुरुस्त कंटेनर उभा होता.रात्री दहा वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील दुचाकीने कंटेनरला मागच्या बाजूने धडक दिल्याने अपघात झाला होता.या अपघातात डोक्याला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महामार्गावर नादुरुस्त होणारी अवजड वाहने टोल वसूल करणाऱ्या कंपनी कडून वेळीच हटवली जात नाही. त्यामुळे महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे.पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षामुळे महामार्गावरील अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा नाहक बळी जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रकला धडकल्यानंतर पेटली बस, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू; २२ जण जखमी

Vijaya Mehta : रंगभूमीचा दीपस्तंभ निमाला! ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT