मुंबई

श्वानाला टॅक्सीत प्रवेश नाकारल्याबद्दल उबरला कंपनीला धाडली थेट नोटीस

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 22 : पाळीव श्वानाला टॅक्सीमध्ये परवानगी नाकारणाऱ्या उबर ऍप टॅक्सीला कायदेशीर नोटीसीचा सामना करावा लागणार आहे. स्वतःच्या पाळीव श्वानासह टॅक्सीमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्याबद्दल वडाळ्यामधील महिला प्रवाशाने उबर इंडिया सिस्टीम प्रा. लि.ला कायदेशीर नोटीस बजावली आहे. सोबतच झालेल्या मनस्तापासाठी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईची देखील मागणी केली आहे.

मुंबईतील वडाळा या भागात राहणाऱ्या रिमा चावला यांनी ऍडव्होकेट प्रशांत नायक  यांच्यामार्फत ग्राहक सेवेत ढिसाळपणा केल्याच्या कारणावरून ही नोटीस बजावली आहे. नोव्हेंबरमध्ये 24 तारखेला सकाळी त्यांनी चेंबूर ते कल्याण या प्रवासासाठी उबर ऍपवरून टॅक्सी बुक केली. टॅक्सीचालक टॅक्सी घेऊन आल्यावर त्यांनी त्यांंचा पाळीव लॅब्रेडोर जातीच्या श्वानाला बरोबर घेऊन प्रवास करायचा आहे, असे चालकाला सांगितले. मात्र पाळीव प्राण्यांना टॅक्सीमध्ये बसण्याची परवानगी नाही, असे म्हणत टॅक्सी चालकाने कुत्र्याला घेण्यास स्पष्ट नकार दिला.

चावला यांनी चालकाच्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले. उबरने नेहमीच पाळीव प्राण्यांबाबत सहानुभूतीचे धोरण अवंलबले आहे. त्यामुळे अशी भूमिका अयोग्य आणि उबेरच्या धोरणाच्या विरुद्ध आहे, असे चावला यांनी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने याला सहमती दिली नाही आणि अयोग्यपणे संबंधित महिलेशी बोलले, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच तसेच स्वतःहून रद्द करण्यासही नकार दिला. जर चावला यांनी टॅक्सी रद्द केली तर त्याचे शुल्क त्यांच्याकडून वसूल केले असते आणि चूक नसताना आम्ही टॅक्सी रद्द करणार नाही. तुम्ही यायला तयार नाही, त्यामुळे तुम्ही टॅक्सी रद्द करा', असे वारंवार सांगूनही चालकाने टॅक्सी रद्द करण्यास नकार दिला. अखेर बऱ्याच वादावादीनंतर चालकाने टॅक्सी रद्द केली.

जेव्हा जेव्हा त्यांच्या श्वानाला टॅक्सीतून घेऊन जायचे असते, तेव्हा तेव्हा उबरकडून वारंवार अशाप्रकारे त्रास सहन करावा लागतो, असेही नोटीसीमध्ये म्हटले आहे. चावला यांना अकारण झालेल्या मानसिक त्रासाबद्दल पन्नास हजार रुपयांची भरपाई आणि कायदेशीर कारवाईबद्दल पंधरा हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच नोटीसीला सात दिवसात उत्तर नाही दिले तर ग्राहक सेवेत कसूर केल्याबद्दल ग्राहक न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा नायक यांनी नोटीसीमध्ये दिला आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधींनी उबरशी संपर्क साधला होता. मात्र उबरकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. 

Uber customer sent notice to company for denying the access to pet dog in cab

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT