मुंबई

UBER टॅक्सीच्या भाडे दरात 15 टक्याने वाढ

UBER टॅक्सीच्या भाडे दरात 15 टक्याने वाढ सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका पण टॅक्सी चालकांना दिलासा Uber Raise Tariff By 15 per cent due to High Fuel Prices

प्रशांत कांबळे

सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका पण टॅक्सी चालकांना दिलासा

मुंबई: कोरोनाच्या महामारीच्या काळात डबघाईस आलेला ऍप बेस्ड टॅक्सी व्यवसायासाठी दिलासादायक बातमी आहे. उबर कंपनीने आपल्या टॅक्सी चालकांसाठी प्रति किलोमीटर भाड्यात वाढ केली आहे. यापूर्वी 7.50 रुपये प्रति किलोमीटर दर मिळायचा मात्र आता त्यामध्ये 15 टक्के वाढ करून, 10 रुपये प्रति किलोमीटर भाडे मिळणार आहे. ऐन कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना याचा मोठा फटका बसणार असला तरी चालकांना याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Uber Raise Tariff By 15 per cent due to High Fuel Prices)

गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या महामारीमुळे रोजगार, छोटे व्यवसाय बंद पडले आहे. तर खासगी नौकऱ्या सुद्धा अनेकांच्या गेल्या आहे. अशापरिस्थितीत सध्या इंधन दरवाढ होत असताना आता, जीवनावश्यक वस्तूंची महागाई सुद्धा झाली असून, आता प्रवासी सेवा सुद्धा महागण्याच्या मार्गावर आहे. मंगळवारी उबरने आपल्या भाडे दरातही वाढ केली असून, मध्यरात्रीपासून हे दर लागू करण्यात आले आहेत.

सध्या मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणारी लोकल सेवा सध्या सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे एसटी, बेस्ट, टॅक्सी, ओला, उबर हेच पर्याय प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे उबरच्या दरवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT