Datta Dalvi Esakal
मुंबई

Datta Dalvi: ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना न्यायालयाचा दिलासा; अटी शर्थींसह मुलुंड कोर्टाकडून जामीन मंजूर

एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले माजी महापौर दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुलूंड कोर्टाने दत्ता दळवींना जामीन मंजूर केला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी दळवींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. (Latest Marathi News)

दत्ता दळवी यांना मुलुंड कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ठाणे कारागृहातून, दळवी आज मुक्त होणार आहेत. गेल्या 2 दिवसांपासून दत्ता दळवी कारागृहात होते. कोणत्याही समाज आणि समूहा विरोधात, दत्ता दळवी यांनी अवमानकारक वक्तव्य न केल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे.

41A ची नोटिस न देता दत्ता दळवी यांना अटक केल्याचा दावा त्यांच्या वकीलांनी केला होता, त्यांच्या दाव्याची कोर्टानं नोंद घेतली आहे. पोलीसांनी सेक्शन 153 गैरलागू केल्याचाही दावा दळवी यांच्या वकिलांनी केला होता, या स्टेजवर हे मान्य होऊ शकत नाही, असं निरिक्षण कोर्टानं नोंदवलं आहे.  (Marathi Tajya Batmya)

चंदा कोचर केसचा रेफरन्स दळवी यांच्या वकिलांनी कोर्टात दिला होता. आरोपी दत्ता दळवी यांचं वय आणि मेडिकल हिस्ट्रीही कोर्टानं लक्षात घेत दत्ता दळनी यांना जामीन मंजूर केला आहे. काही अटी आणि शर्ती पाळण बंधनकारक केलं आहे.

अटी -

केस तपास संपण्यापर्यंत काही प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. त्यांना मुख्यमत्र्यांविरोधात कोणतंही अवमानकारक वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीसांना सहकार्य करण बंधनकारक आहे.

कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेणं बंधनकारक राहणार आहे. दळवी यांच्या जामीन अर्जास, मुंबई पोलिसांनी सक्त विरोध केला होता. दळवी यांचे वकिल संदीप सिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Marathi Tajya Batmya)

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेतून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी (२७ नोव्हेंबर) भांडुपमधील ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहिर मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी जोरदार टीका केली होती. यावरून शिंदे गटाचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

दत्ता दळवी यांनी जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं, असा आरोप करत शिंदे गटाने भांडूप पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, शिंदे गटाच्या तक्रारीनंतर भांडूप पोलिसांनी जी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भादवी कलम १५३ (अ),१५३ (ब),१५३(अ) (१)सी, २९४, ५०४,५०५ (१) (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT