Uday Samant statement Inquiry of industry project three-member committee set up mumbai esakal
मुंबई

Uday Samant : उद्योग बाहेर गेल्याची चौकशी; उदय सामंत

उदय सामंतांची माहिती; तीन सदस्यीय समिती स्थापणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘गेल्या अडीच वर्षांत अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले, मात्र हे उद्योग कोणत्या कारणामुळे गेले याच्या चौकशीसाठी माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. तीन महिन्यात ही समिती अहवाल राज्य सरकारला सादर करणार असल्याचेही केले.

राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांच्या संदर्भात पुढील सहा महिन्यात श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘‘महाराष्ट्राचे वातावरण उद्योगांसाठी अनुकूल आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या राजकीय आरोपामुळे राज्यातील वातावरण दूषित होऊ शकते. अशा परिस्थितीत आगामी काळात महाराष्ट्रात ५० हजार कोटींचे विविध प्रकल्प आणून त्यांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत,’’ असे सामंत म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारचा संबंध नाही

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, ‘‘आदित्य ठाकरे यांचे आरोप राजकीय आहेत. आघाडी सरकारच्या काळात मागील आठ महिन्यात बैठक झाली का याची माहिती आदित्य यांनी द्यावी. वेदांतचा सामंजस्य करार झाला नव्हता हे मी प्रामाणिकपणे आणि ठामपणाने सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी वेदांत फॉक्सकॉन कंपनीला महाराष्ट्र उद्योग स्थापन करण्यासाठी पत्र पाठवले होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर हा प्रकल्प गुजरात पाठवला या आरोपात तथ्य नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

Maratha Quota Meet: अंतरवली सराटीत मराठा सेवकांची तातडीची बैठक; आरक्षणासह आगामी आंदोलनाच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष

Wai Bhuinj Police Action: भुईंज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरणारी ‘पिकअप गँग’ जेरबंद, सहा जनावरांच्या चोरीची कबुली

SCROLL FOR NEXT