Thackeray Pawar 
मुंबई

Uddhav Thackeray: ठाकरेंनी घेतली पवारांची बाजू! शेतकऱ्यांसाठी काय केलं? विचारणाऱ्या मोदींनाच केला प्रतिप्रश्न

शिर्डीत सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर निशाणा साधला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी इथल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल विचारला होता. यावरुन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पवारांची बाजू घेत थेट पंतप्रधानांनाच सवाल केला आहे.

मुंबईत ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्याल संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. (Uddhav Thacekray asked questions to PM Modi and took Sharad Pawar side over critisism on farmers at Shirdi)

७० हजार कोटींचा आरोप संपला

उद्धव ठाकरे म्हणाले, "काल परवा पंतप्रधान शिर्डीत येऊन गेले पण अजित पवार भाजपसोबत जाण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीवर आरोप काय होते? तर त्यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केला. त्यानंतर परवा आले तेव्हा बाजूला अजित पवार बसले होते. तेव्हा ७० हजार कोटींचा घोटाळा गायब! कारण करणार कोणावर आरोप ते तर बाजुलाच बसले आहेत" (Latest Marathi News)

शेतकरी-पवार बघून घेतील

मग काय तर शेतकऱ्यांसाठी यांनी काय केलं? असा प्रश्न केला. पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं हे शेतकरी आणि शरद पवार बघतील. पण तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं? उत्तरेतील शेतकरी वर्षभर रस्त्यावर थंडी, वारा पावसात का बसले होते? का त्यांचे जीव घालवलेत तुम्ही? त्यानंतर तो काळा कायदा मागे का घेतला? (Marathi Tajya Batmya)

तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं?

त्यामुळं तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करत होतात आणि शेतकऱ्याला कसं चिरडत होतात ते सांगा ना. फक्त यानं काय केलं त्यानं काय केलं? हे म्हणणं सोपं असतं. पण तुम्ही किती लायक आहात ते सांगा. असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT