Navi Mumbai sakal
मुंबई

Navi Mumbai: उद्धव ठाकरेंची आज ऐरोलीत सभा, हे महत्वाचे रस्ते रहाणार बंद

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai News: ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारानिमित्त ऐरोली सेक्टर तीनमधील श्रीराम विद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेमुळे वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने वाहतूक विभागाने रविवारी (ता. ५) दुपारी तीन ते रात्री दहा या कालावधीत ऐरोली सेक्टर १७ येथील जामा मस्जिद ते अक्षर सोसायटी, फायर ब्रिगेड चौक मार्गावर सर्व प्रकारची वाहतूक बंद आहे.(Uddhav thackeray News)

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत रविवारी दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत स्वर्गीय मीनाताई ठाकरे मार्ग-भारत बिजली चौकाकडून तसेच ऐरोली सेक्टर १७ जामा मस्जिदकडे येणारी सर्व वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

या काळात वाहनांना फायर ब्रिगेड चौक येथून सेक्टर पाच जानकीबाई मढवी हॉलमार्गे इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे. त्याचप्रमाणे ऐरोली सेक्टर तीनमधील अय्यंगार बेकरी ते ऐरोली सेक्टर चार महाराष्ट्र कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट छत्रपती शाहु महाराज मार्गावर बदल करण्यात आला आहे.(Shivsena)

त्यामुळे या मार्गावरील वाहनांना ऐरोली सेक्टर तीनमधील जनता मार्केट ऐरोली डेपोमार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. या अधिसूचनेतून इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आल्याचे रबाळे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.aairavli

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking News : चौथीच्या मुलीने इमारतीवरुन उडी मारुन संपवलं जीवन; शाळेवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

Nashik Cyber Fraud : शेअर ट्रेडिंगचा अनुभव असूनही फसले! निवृत्त अधिकाऱ्याने २.२४ कोटींची आयुष्यभराची कमाई गमावली

Shah Rukh Khan : शाहरुखला आजही होतो बाळासाहेबांना न भेटल्याचा पश्चाताप, या कारणाने झाला होता वाद, काय घडलेलं नेमकं?

Mumbai Morcha: विरोधकांच्या मोर्चाला भाजपचे प्रत्युत्तर, ठाकरे बंधूंवर प्रदेशाध्यक्षांचा घणाघात!

Chandrakant Gurav : नाशिकच्या शेतकरी संघटनेचा आधारस्तंभ हरपला; चंद्रकांत गुरव यांचे दुखद निधन

SCROLL FOR NEXT