Uddhav Thackeray and BJP MP Kapil Patil on Inauguration of Covid center  
मुंबई

उद्धव ठाकरे भाजप खासदाराला म्हणाले, 'आपण असेच संपर्कात रहा; कधीतरी उपयोगात येईल'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: ठाण्याच्या ग्रामीण भागातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना ठाणे महापालिका रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची नेहमीच मदत झाली असे भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी एका भाषणात सांगितले.

शिंदे  यांनी आपल्याला कायमच मदत केली आहे असं कपिल पाटील म्हणाले , त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण असेच संपर्कात रहा कधीतरी उपयोगात येईल'' मुख्यमंत्र्यांच्या या मिश्किल टीप्पणीने अनेकांनी भूवया उंचावल्या.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील लाल चौकी परिसरात कोविड समर्पित रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हर्च्युअल उद्‌घाटन करण्यात आले. त्यावेळी नेत्यांनी एकमेकांचे तोंडभरून कौतूक केले.

कल्याण डोंविलीच्या महापौर विनिता राणे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक करताना ते पेशाने डॉक्‍टर असल्याने अधिक मदत झाल्याचे सांगितले. त्यावर भिवंडीचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी, "डॉक्‍टर अधिक मदत करतात, हे माहीत असते तर एमबीबीएस होऊन लोकप्रतिनिधी झालो असतो' असे मिश्‍कील उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT