Uddhav Thackeray Birthday esakal
मुंबई

Uddhav Thackeray Birthday : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाआधीच बॅनर गायब; ठाकरे गट आक्रमक, पोलिसांत तक्रार

दोन ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काढण्यात आल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

शर्मिला वाळुंज

यंदा इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले असून वाढदिवसाला कुणीही 'मातोश्री' निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

डोंबिवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे (Uddhav Thackeray Birthday) बॅनर वाढदिवसाआधीच गायब झाले आहेत. कल्याणमध्ये ही घटना घडली आहे.

दोन ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काढण्यात आल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. बुधवारी रात्री हे बॅनर काढण्यात आले असून याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात (Mahatma Phule Chowk Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कल्याणची परिस्थिती बिघडवू नका असे आवाहन ठाकरे गटाने केले असून ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै हा वाढदिवस शिवसैनिक दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रम राबवून साजरा करतात.

उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, तसेच देशाच्या विविध भागांतून शिवसैनिक 'मातोश्री' निवासस्थानी पोहचतात. यंदा मात्र इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले असून वाढदिवसाला कुणीही 'मातोश्री' निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कल्याणमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पक्ष प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरात लावले आहेत. बिर्ला कॉलेज रोड परिसर, तसेच भोईरवाडी येथील बॅनर अज्ञात व्यक्तीकडून बुधवारी रात्री काढण्यात आले.

ही बाब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना समजताच एकच खळबळ उडाली आहे. सकाळी लावलेले बॅनर रात्री गायब झाल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत अज्ञात व्यक्तीने जाणून-बुजून बॅनर काढून टाकल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेचा निषेध नोंदवत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठाकरे गटाचे पदाधिकारी माजी परिवहन सभापती रविंद्र कपोते म्हणाले, 'ज्यांनी कोणी हे कृत्य केले आहे त्यांना आमचं एकच म्हणणं आहे की कल्याणची परिस्थिती बिघडवू नका. कल्याणमध्ये शांतता राहू द्या. आपल्या शहराचा आपल्याला अभिमान आहे. पोलिसांना देखील आम्ही मागणी केली आहे की, यावर कायदेशीर कारवाई करा.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT