Uddhav Thackeray criticize opposition Shiv Sena went ahead Dharmaveer Anand Dighe mumbai e sakal
मुंबई

शिवसेना संपवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांना संपवत शिवसेना पुढे गेली; उद्धव ठाकरे

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ट्रेलर लॉंचच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काही क्षण असे असतात की त्या काळात आपण जातो आणि शब्द सुचेनासे होतात. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाची झलक बघताना शिवसेना म्हणजे काय आहे ? शिवसैनिक म्हणजे काय आहे ? गुरू आणि शिष्याचे नाते जपणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. ही भावना असल्याने शिवसेना संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना संपवून शिवसेना पुढे गेली, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. आनंद दिघे हे ५० वर्षे काम केले पण ते १०० वर्षे जगले असेही गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. आनंद दिघे यांच्यावरील धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचच्या वेळी ते बोलत होते.

आनंद दिघेंची निष्ठा काय हे लोकांना चित्रपटाद्वारे कळेल. दिघेंनी अनेकांना जपले. पण बाळासाहेबांचा वक्तशीरपणा या गुणामुळेच आनंद दिघेंसारखे अनेक शिवसैनिक त्यांनी घडवले. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे यापुढे ठाणेकरांचे ह्दय ही एक ओळ असायला हवी होती. दिघेंवर चित्रपट काढत त्यांचे कार्य पुढे नेणे ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी तर आनंद दिघेंच्या भूमिकेत प्रसाद ओक आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचच्या निमित्ताने अब्दुल सत्तार, आमदार रवींद्र फाटक, जॅकी श्रॉफ, श्रुती मराठे, सुशांत शेलार, खासदार हेमंत पाटील, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, संजय राऊत, शर्मन जोशी, दिव्या दत्ता, वरूण सरदेसाई, गुलशन ग्रोवर, अमिषा पटेल, इशा कोप्पीकर, खासदार गजानन कीर्तीकर, ठाणे जिल्हाधिकारी राजेशनार्वेकर, बच्चू कडू, रितेश देशमुख, आमदार सुनील शिंदे यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या चित्रपटाला साऊथचे सुपरस्टार राजा मौली, अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या. आनंद दिघे यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन सामान्य अडलेल्यांना मदत केली. आनंद दिघेंची भूमिका अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारली असे ते म्हणाले, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित हे सर्व लोक आहेत याचे श्रेय दिघे यांच्या कार्याला जाते असेही शिंदे म्हणाले.

याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अभिनेता सलमान खान, रितेश देशमुख, खासदार संजय राऊत, रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे, अब्दुल सत्ता, बच्चू कडू यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांचा सत्कार केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे यांची भुमिका करणारे अभिनेते प्रसाद ओक, दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अन्य कलाकार तंत्रज्ञांचा सत्कार झाला. ‘धर्मवीर’ या बहुचर्चित चित्रपटाची झलक यावेळी प्रदर्शित झाली. यावेळी कलाक्षेत्रातील तसेच राजकीय पटलावरील मांदियाळी उपस्थित होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT