aditya thackeray dasara melawa esakal
मुंबई

Aditya Thackeray: उद्धव ठाकरे आले की भाषण करणार नाही.. पहिल्याच दसरा मेळाव्यात काय बोलले आदित्य ठाकरे? सांगितली हिंदुत्वाची व्याख्या

Dasara Melava Aditya Thackeray Speech: उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाषण केले आहे. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

Vrushal Karmarkar

Aditya Thackeray Speech: मी उद्धव ठाकरे आले की भाषण करणार नाही. कारण आमच्या घरात वडिलांसमोर कोणी भाषण करत नाही. राज्यात महायुती सरकार नुसतं भ्रष्टाचार करत आहे. सर्वत्र भ्रष्टाचार सुरू आहे. कुणीतरी नुसतं म्हणत असतं आणि म्हणून.. आज‌ किती‌ म्हणून ‌बोलतील मला माहिती नाही. मात्र सर्वानी लक्षात ठेवा पुढच्या एक महिन्यात आमचं सरकार येणार आहे, अशी आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थावरून सांगितलं आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

आज शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडत आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, जोपर्यंत‌ अदानींची‌ कामं होत‌ ‌नाही तोपर्यंत आचारसंचिता लागणार नाही, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. महाराष्ट्राची लूट रोखण्यासाठी आमची लढाई सुरू आहे. आपलं सरकार आल्यावर प्रत्येकाची फाईल आपण काढणार आहोत‌. अधिकारी असो किंवा राजकारणी ‌ज्यांनी लूट केली त्यांना आत‌ ‌टाकणार.

आदित्य ठाकरे म्हणाले की, आमची‌ प्राथमिकता नोकरी आहे. हाताला काम हृदयात राम हेच‌ आमचं हिंदुत्व आहे. महायुतीमध्ये खोक्यांसाठी रस्सीखेच सुरू आहे. मात्र महाराष्ट्र तुम्हाला सोडणार नाही. स्वत:साठी खोके आणि राज्याला धोके असं त्यांचं सुरू आहे. राज्यातील प्रोजेक्ट गुजरात पाठवले आहे. आपले सरकार आल्यावर याची शिक्षा त्यांना आम्ही देणार. विधानसभा निवडणूक मोठी लढाई आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT