Uddhav Thackeray esakal
मुंबई

Uddhav Thackeray: अदानी आमची जान, आम्ही दिल्लीत शेपूट हलवणारे श्वान... शिंदेंच्या घोषणेवरून ठाकरेंची जळजळीत टीका

Uddhav Thackeray Dasara Melava Speech: दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी जनतेसोबत संवाद साधला आहे. त्यांनी यावेळी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

Vrushal Karmarkar

प्रत्येकाकडे वेगवेगळी शस्त्र असतात. आमच्याकडे लढवय्या मन आहे. शिवसेनाप्रमुखाच्या ‌कुंचल्यांची पुजा‌ केली.तुम्ही पण माझे शस्त्र आहात. ही लढाई सोपी ‌नाही आहे. सर्व ओरबडून घेतलं तरी तुम्ही माझ्याबरोबर आहात. कितीही त्यांच्या पिढ्या आल्या तरी आपण त्यांना गाडायला तयार आहोत, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे. ते आज शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यात बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, टाटा गेले तर देश हळहळत आहे. टाटा मीठ हे जेवणात लज्जत‌ वाढवते. पण काही लोक मिठागरं घेत आहे. जे जायचे ते का ‌जात नाही हे कळत नाही, असं म्हणत नाव न घेता अदानींवर निशाणा साधला आहे. मी हिंदुत्व सोडलेलं नाही. भाजपचे हिंदुत्व गोमुत्रधारी बुरसटलेले आहे. मिंधेंची घोषणा अशी पाहिजे की, अदानी आमची जान, आम्ही दिल्लीत शेपूट हलवणारे श्वान... मला कुणाचा अपमान करायचा‌ नाही. हे वाघाचे कातडे घातलेले लांडगे आहेत, अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे.

भाजपला खांदा ‌द्यावा लागेल. यांची प्रवृत्ती संपवावी लागेल. महाराजांचा पुतळा उभारण्यात पैसे खाल्ले. आपलं सरकार आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं ‌मंदिर प्रत्येक जिल्ह्यात बांधणार, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाराजांचं मंदिर प्रत्येक राज्यात उभारलं पाहिजे. मोदी आणि मिंधे महाराजांना फक्त मतांचं मशीन मानतात. महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन नाही.भागवतांबद्दल, संघाबद्दल मला आदर आहे. पण तुम्ही जे बोलता त्याबद्दल आदर नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, १० वर्ष झालं विश्वगुरु तिथं बसले आहेत. मग हिंदू धोक्यात कसे आहेत. मला मुख्यमंत्रीपदावरुन ‌खाली खेचलं हे बघवलं नाही.आताचा भाजप हायब्रिड झालं आहे. इतर पक्षांचे नेते भाजपच्या गर्भात घुसले आहेत. भारतीय जनता पक्षाला भारतीय म्हणायला लाज वाटली ‌पाहिजे. राज्य माता गाय झाली आहे. मग महिलांवरच्या अत्याचाराचे हंबरडे तुम्हाला ऐकू येत नाही का? असा सवाल करत ठाकरेंनी आधी आईची रक्षा करा मग गाईला माता बनवा, असं सरकारला सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

“वयाचं गणित फेल!” – सुबोध-रिंकूच्या जोडीनं सोशल मीडियावर रंगली ट्रोलिंग, रिंकू- सुबोधच्या वयात नक्की किती अंतर आहे?

Latest Marathi News Live Updates : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा कहर! वांद्र्यात मुलगा बुडाला, शोध घेण्याचे प्रयत्न सुरू, परिसरात भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT