Sushma Andhare ESakal
मुंबई

Sushma Andhare: फडणवीसांनी बंगला विकून पैसे दिले नाहीत.. लाडक्या बहिणींना सुषमा अंधारेंनी केलं खास आवाहन, काय म्हणाल्या?

Uddhav Thackeray Dasara Melava: उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी भाषण केले आहे. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Vrushal Karmarkar

Sushma Andhare Speech: आज मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडत आहे. यावेळी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी भाषण केले आहे. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरून सरकारला धारेवर धरलं आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, महायुती सरकारने राज्याचा खेळखंडोबा केला आहे. राज्यातील न्यायव्यवस्थेला वेठीस धरण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे. हे झाकण्यासाठी आश्वासनांची खैरात सुरू केली. ते म्हणाले विरोधकांना लाडकी बहीण योजना खुपत आहे. मात्र ही योजना खुपायचं कारण काय आहे? लाडक्या बहिणीने पैसे घेतले पाहिजेत. कारण लक्षात असू दे, जे पैसे मिळत आहेत, ते पैसे देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा बंगला विकून दिलेले नाही. तसेच ते पंधराशे रुपये एकनाथ शिंदेंनी त्यांची जमीन विकून दिलेले नाहीत. दोघांनीही त्यांच्या खिशातून हे पैसे दिले नाहीत. हे पैसे आमच्या कष्टाचे आहेत. नागरिकांनी जो टॅक्स भरला त्याचे हे पैसे आहेत. तुम्ही याचं क्रडिट घेऊ नका, असं म्हणत अंधारेंनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात जातीत जात ठेवली नाही. मोहन भागवतांनी फडवीसांना समजवावं. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जातीय द्वेष पसरवलाय. बहिणीला पैसे दिल्यावर आपण कधी बॅनर लावले का? कारण आपल्याला नात्यांची किंम्मत माहिती आहे. मात्र या सरकारला बहिणीचे नाते कळले नाही. हे सरकार बाईपणावर हल्ले करत आहे. मात्र हे बाळासाहेबांचे संस्कार असू शकत नाही. हे संस्कार रेशीमबागेतील आरएसएसच्या बाटगेंचे असू शकतात. हे सरकार बहिणींना पैसे देऊ शकतं पण ज्या महिलेवर अत्याचार झाला आहे, तिला न्याय देऊ शकत नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT