CM eknath shinde  sakal
मुंबई

Mumbai Politics : ठाकरे गटाला झटका ! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तीन माजी नगरसेवक शिंदे गटात

शिवसेना ठाकरे गटातील माजी तीन नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शिवसेना ठाकरे गटातील माजी तीन नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आतापर्यंत ३३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला असून येत्या काळात आणखी काही माजी नगरसेवकांना गळाला लावत ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात जोगेश्वरीतील प्रभाग क्रमांक ७३ चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे आणि प्रभाग क्रमांक ८८ च्या माजी नगरसेविका स्नेहल शिंदे यांचा यात समावेश आहे.

त्यांच्यासह जोगेश्वरी, वर्सोवा आणि विलेपार्ले विभागातील १०० हुन अधिक पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या सर्वांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुंबईत आतापर्यंत ठाकरे गटाच्या ३३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो.

भाजप-शिवसेना सत्तेत आल्यापासून मुंबईत अनेक विकासकामे वेगाने सुरू झाली असून, त्यामुळे या आंतरराष्ट्रीय शहराला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देऊन मुंबईतून बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

Moong-Rava Bites: खायला टेस्टी, तब्येतीसाठी बेस्ट; मूग आणि रव्यापासून बनवा हाय-प्रोटिन खुसखुशीत बाईट्स!

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी! सोलापुरात आता ‘या’ कार्यालयात दरमहा दोनदा रोजगार मेळावे; मुलाखतीतून थेट जॉबची संधी, वाचा...

Baramati Smart Village: बारामती तालुक्यातील दहा गावांचा ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट

SCROLL FOR NEXT