Uddhav Thackeray sakal
मुंबई

Dasara Melava: मुंबईत असली आणि नकली शिवसेनेचा दसरा मेळावा, मात्र शिवतीर्थावर... ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत

Dasara Melava: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा आज मुंबईत दसरा मेळावा होणार आहे. याआधी ठाकरे गटाच्या नेत्याने एक वक्तव्य केले आहे. ते चर्चेत आले आहे.

Vrushal Karmarkar

Dasara Melava: आज देशभरात दसरा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त मुंबईत शिवसैनिकांकडून ठिकठिकाणी मोठमोठ्या मिरवणुका काढण्यात येत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या दोन गटांमधील ताकद दाखविण्यासाठी हा प्रयत्न होत आहे. याचवेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलेले वक्तव्य आता चर्चेचा विषय बनले आहे.

नेमकं काय म्हणाले?

एका वृत्तसंस्थेने शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांना विचारले की, आज मुंबईत शिवसेनेच्या दोन रॅली होत आहेत. अशा स्थितीत खरी शिवसेना कोणाला मानता येईल? त्यावर उत्तर देताना आनंद दुबे म्हणाले, "आज मुंबईत दोन दसरा मेळावा होत आहेत हे खरे आहे. एक खरी शिवसेना आणि दुसरी नकली शिवसेनेची. दरवर्षीप्रमाणे यंदाही खऱ्या शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावर होत आहे.

आनंद दुबे पुढे म्हणाले, शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून लोक येतात. त्यांना हा वारसा बाळासाहेबांकडून मिळाला आहे. तुम्ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची तुलना नकली शिंदे गटाच्या शिवसेनेशी करू शकत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तुलना इतर कोणत्याही शिवसैनिकाशी होऊ शकत नाही.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता, आदर आणि चारित्र्य यासाठी काम केले आहे. इतरांनी महाराष्ट्राच्या पाठीत वार केले आणि दिल्लीचे नोकर राहिले. त्यामुळे दोघांची तुलना होऊ शकत नाही. शिवसेनेचे यूबीटीचे प्रवक्ते आनंद दुबे यांनीही एक-दोन महिन्यात नकली शिवसेना कुठेही दिसणार नाही, असे सांगितले. महाराष्ट्रात एकच शिवसेना उरणार आहे, असं ते यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT