CM Uddhav Thackeray Sakal
मुंबई

'भाजपने जिंकलेल्या मतदारसंघांची यादी द्या', सेनेचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

ओमकार वाबळे

शिवसेनेच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व खासदारांची ही बैठक पार पडत आहे. २२ मार्चपासून सर्व खासदार मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर देखील जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली होती. याआधी ही बैठक पार पडत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आजी माजी नगसेवक यासाठी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदारांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केलं. शिवसेनेचे विचार गावा गावात पोहोचवणे गरजेचे आहे. सत्ता आल्यानंतर निखाऱ्यावर जमलेल्या राखेवर फुंकर मारणं गरजेचं असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेनेने काही मतदारसंघात पक्ष वाढवणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

'त्या मतदारसंघांची यादी मला द्या'

आपल्या सोबत भाजपने युती तोडली. मात्र आता भाजपकडे कोणते मतदार संघ आहेत, हे पाहा. त्यांनी कोणते जिंकले, त्या ठिकाणी तयारी करा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. या मतदारसंघांची सविस्तर यादी मला द्या, असं त्यांनी म्हटलं. तिथं नव्या जोमाचा उमेदवार तयार करा. माझ्याकडे नावं दया, असं ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचे सर्व खासदार 22 ते 25 मार्च दरम्यान मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली होती. संघटनात्मक बांधणी आणि जिल्हा परिषद गटा पर्यंत पदाधिकाऱ्यांशी संवाद या साठीच हा धडक दौरा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने होत आहे, असं त्यांनी म्हटलंय.

याआधी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना राज्यातील सर्व निवडणुकासाठी कंबर कसण्याचे आदेश दिले होते. राज्यातील प्रत्येक निवडणुकीत शिवसेना सक्रिय होणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. त्यानुसार राज्यभरात शिवसेना पाळंमुळं रोवण्यासाठी सक्रिय झाली आहे. या वर्षात राज्यात १३ मनपा निवडणुका पाईपलाईनमध्ये आहेत. याशिवाय आरक्षणामुळे रखडलेल्या जिल्हा परिषदा आणि नगरपंचायती देखील आहेत. या साठी तयार होण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: CNG महागल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Team India Matches Today: वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा अन् स्मृती मानधना एकाच दिवशी मैदानात! केव्हा, कुठे रंगणार आज सामने; एका क्लिकवर वाचा

Suresh Borse Death Case : शिक्षक मृत्यू प्रकरणी PSIसह अंमलदार निलंबित; अटकेची प्रक्रिया सुरू; संशयितांना वाचवण्याचा होता प्रयत्न

Yavatmal: महसूल मंत्र्यांनी घेतला ‘एसडीओं‘चा क्लास, मिटींगमध्ये बिघडली अधिकाऱ्याची प्रकृती; रुग्णालयात उपचार सुरू

Chandrapur: लाच घेताना दुय्यम निबंधक, ऑपरेटर अटकेत

SCROLL FOR NEXT