sanjay raut sharad pawar ajit pawar esakal
मुंबई

Sanjay Raut: ज्यांनी पाच वेळा उपमुख्यमंत्री केलं त्यांना हुकूमशाह म्हणता, लाज वाटायला हवी; राऊतांनी बोचरी टीका

कार्तिक पुजारी

मुंबई- पाच राज्यातील विधानसभा निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यातील पाचही राज्यात इंडिया आघाडी एकत्र लढेल आणि निवडणूक आम्ही जिंकू, अशी खात्री ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या घोषणेसह राज्यातील १४ महानगरपालिकेच्या निवडणुकाही जाहीर कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.

बाळासाहेबांना विठ्ठल म्हणून पक्ष फोडला. भाजपने तोडा, फोटा आणि राज्य करा ही नीती देशात आणली आहे. कितीही पक्ष फोडले तरी मुळ विचार मुळ पक्षाकडेच असतो. शिंदेंची शिवसेना म्हटलं की लोकं हसतात, अजित पवारांची राष्ट्रवादी म्हटलं की लोक हसतात. लोक वेड्यात काढतात, अशी टीका त्यांनी केली.

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करते. शरद पवार हे हयात आहेत. निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी शरद पवार समोर बसले होते. त्यांच्यासमोर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दावा सांगताहेत की राष्ट्रवादी आमची आहे. मग समोर बसलेले शरद पवार काय मेणाचा पुतळा म्हणून बसले होते का? असा सवाल त्यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाला देखील काही वाटलं पाहिजे. पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष बसले आहेत आणि कोणी पक्षावर दावा सांगतोय. भाजपची ही नीती आहे. भाजप हा देशातील लोकशाही खड्ड्यात घालणार आहे. आमच्यावरही असेच आरोप होत आहेत. पण, हे आरोप ते करत नसून दिल्लीतून काळी टोपी वाल्यांचे स्क्रिप्ट येतंय ते वाचून दाखवलं जातंय, असं ते म्हणाले.

ज्या हुकूमशाहाने अजित पवारांना पाचवेळा उपमुख्यमंत्री केलं. ज्या हुकूमशाहाने प्रफुल्ल पटेलांना केंद्रापासून राज्यापर्यंत अनेक पदं दिली. ज्या हुकूमशाहाने तुरुंगातून सुटलेल्या भुजबळांना मंत्रिपद दिलं. त्यांना तुम्ही हुकूमशाह म्हणता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT