uddhav thackeray  uddhav thackeray
मुंबई

मुंबईत शिवसैनिकांवरील हल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंचा प्रतिक्रिया, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : काल भायखळा येथील शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला होता, त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील शिवसेनेच्या शाखेला भेट दिली, यादरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, दरम्यान या भेटी दरम्यान पोलिसांशी बोलत असताना पोलिसांनी राजकारणात पडू नये असे सांगितले आहे

आज माजी उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील शिवसेनेच्या २०८ नंबरच्या शाखेला भेट दिली , यावेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला झाल्याचे ठाकरे यांच्या कानावर घातले, यानंतर ठाकरे यांनी पोलिसांना धारेवर धरले. ते म्हणाले की, ज्यांनी तक्रार केली त्यांना सुरक्षा दिली, मग शिवसेना पदाधिकाऱ्यांना का दिली नाही? असा सवाल पोलिसांना केला. ते पुढे म्हणाले की, तुम्ही राजकारणात पडू नका, राजकारणाचं काय करायचं ते आम्ही बघू, लढायचं ते लढू. पण जीवाशी खेळ होणार असेल तर शांत बसणार नाही. शिवसैनिकाच्या केसाला जरी हात लागला तरी तुम्ही जबाबदार असाल. संशयित-आरोपींच पुढे काय झालं? असा सवाल देखील त्यांनी यावेळी पोलिसांना केला.

ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले की, तुमच्याकडून होणार नसेल तर हात वर करा, मग शिवसैनिक बघतील कसं रक्षण करायचं ते, शिवसैनिक रक्षण करायला समर्थ आहेत, असेही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हाणाले. आपल्याकडे कर्तेकरविते उपमुख्यमंत्री आहेत, त्या उपमुख्यमंत्र्याना जाऊन विचारा, तुम्ही सांगा की आमच्याकडून तुमचं संरक्षण शक्य नाहीये, मग आमचं संरक्षण आम्ही करतो, असा खोचक टोला देखील ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही

Pune Crime: साखरपुड्यानंतर केतनला आलेली शंका, सियाचं बॅकग्राउंड माहितीय का? वडिलांना केलेली विचारणा पण...

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मोठी घडामोड! सुनावणीत राज्य सरकारचा युक्तिवाद; पूर्वीच्या आयोगातील त्रुटी दूर झाल्याचा दावा

Nashik Girl Death VIDEO : लस टोचून घेतल्यानंतर चक्कर येऊन पडली, 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत; दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील घटना

Karad Flyover Update : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराडचा उड्डाणपूल कधीपासून सुरू होणार? तीन दिवसांची चाचणी पूर्ण; पुलावर सध्या काय काम सुरुये?

SCROLL FOR NEXT