Uddhav Thackeray and Narendra Modi 
मुंबई

Uddhav Thackeray : ...तर आमचा मोदी सरकारला जाहीर पाठिंबा; ठाकरेंचं 'या' मुद्यावर मोठं विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचं आज मुंबई कार्यकर्ता शिबीर आयोजित कऱण्यात आलं असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. तसेच केंद्रातील भाजप सरकारसह एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी समान नागरी कायद्यावर भाष्य केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मला लोक विचारतात, समान नागरी कायद्याबाबत तुमचं मत काय आहे. समान नागरी कायदा आणा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, असंही ते म्हणाले. पण समान नागरी कायदा आणण्याआधी माहिती वाचा. एकदाय काय तो कायदा कराच. मात्र त्याआधी हिंदुंना त्याचा काय त्रास होणार हेही सांगा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

दरम्यान समान नागरी कायद्याचं बोलतात, पण यांना गोवंशहत्या बंदी तुम्ही देशभर करू शकत नाही. प्रत्येक राज्यात गोवंश हत्याबंदीबाबत वेगवेगळे कायदे आहेत. त्रिपुरात तुमचे नेते म्हणतात आम्ही गोमांस खातो. त्यांचं काय वाकडं केलं. समान नागरी कायदा आणायचा असेल तर राज्यकर्ते म्हणून समान वागणूक कायदा पहिल्यांदा आणा, असंही उद्धव यांनी म्हटलं.

कायदा सर्वांना समान आहे. केवळ खोटेनाटे आरोप करायचे. त्यांनी तुरुंगात टाकायचं. आम्ही आरोप केले की झाकून ठेवायचं. आमच्या झोपडपट्टीतील कार्यकर्त्यांवर ईडी-सीबीआयची कारवाई केली जाते, असंही उद्धव यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

दीप-ज्योतीची वाढती जवळीक तर तारिणीच्या जीवाला धोका; ‘झी मराठी’वरील मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

निवेदिता सराफ करतात ते इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? किती ते किती वाजेपर्यंत करतात? म्हणाल्या, 'मी कायम...'

SCROLL FOR NEXT