Uddhav Thackeray esakal
मुंबई

Uddhav Thackeray: एक तर तू राहशील नाहीतर मी... उद्धव ठाकरेंनी फडणविसांना दिला निर्वाणीचा इशारा, शिवसैनिकांना देखील दिला आदेश

Uddhav Thackeray addresses Shiv Sainiks at Rangsharada in Mumbai : ठाकरे यांनी सांगितले की, "शिवसेना गांजलेला नाही तळपती तलवार आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल त्यांनी म्हटले की, मनसुबे मुंबई आणि महाराष्ट्र भिकारी करण्यासाठी आहेत.

Sandip Kapde

उद्धव ठाकरे यांनी आज रंगशारदा येथे शिवसैनिकांचा मेळावा घेताल. या मेळाव्यात त्यांनी हल्लाबोल केला. ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना थेट अंगावर जाण्याचे आदेश दिले. "अंगावर जा बिन्धास्त," असे ते म्हणाले. तसेच "एक तर तू राहशील नाहीतर मी," असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला.

उध्दव ठाकरे यांच्या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना निर्माण केली आहे आणि आगामी निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरेंच्या भाषणामुळे विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे.

लढाईला तोंड फुटत आहे

उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "मी असा नडलो की मोदींना घाम फोडला." मुंबईतील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

ठाकरे यांनी पुढे म्हटले की, "महाराज आणि मावळे हे हर हर महादेव म्हणत तुटून पडायचे." मुंबईतील ४ खासदार निवडून आणल्याचा उल्लेख करून त्यांनी शिवसेनेच्या सामर्थ्याची चर्चा केली.

आव्हानं आणि राजकारण

लोकसभा निर्णयानंतर अनेक INDIA चे नेते भेटले आणि म्हणाले, "आप ने तो देश को दिशा दिखाई। किसी की हिम्मत नही मोदी को बोलने की।", असे ठाकरेंनी सांगितले. त्यांनी भाजपाला 'षंढ' म्हटले आणि आरोप केले की पक्षाने त्यांच्या बापाला चोरले. नडलो तर असा नडलो की मोदी ला घाम फुटला, असे ते म्हणाले.

शिवसेनेचा उद्देश

ठाकरे यांनी सांगितले की, "शिवसेना गंजलेली नाही तळपती तलवार." मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल त्यांनी म्हटले की, "यांचे मनसुबे मुंबई आणि महाराष्ट्र भिकारी करण्यासाठीची आहेत."

शिवसेनेची अस्तित्वाची लढाई

"ही शिवसेना अस्थित्वाची लढाई नाही मुंबईच्या अस्थितवाची आहे," असे सांगून त्यांनी शिवसेनेच्या लढाईची महत्त्वता पटवून दिली.

धर्म आणि हिंदुत्व-

ठाकरे यांनी हिंदुत्वावर बोलताना म्हटले की, "शंकराचार्य म्हणतात विश्वास घात करणार हिंदू असू शकत नाही...."

आमदार अपात्र प्रकरण-

आमदार अपात्र प्रकरणावर सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार आहे. यावर ठाकरे म्हणाले, "लवकरच निकाल लागेल... आमची सुप्रीम कोर्टावर श्रद्धा आहे... मला माझं शिवसेना नाव पाहिजे जे मला मिळणार हा विश्वास आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT