मुंबई

उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा पदभार

सकाळ वृत्तसेवा

काल उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात दाखल झालेत आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला आहे.  

मातोश्रीवरून निघाल्यावर उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. मंत्रालयात पोहोचल्यावर उद्धव ठाकरे यांनी इथे उपस्थित सर्वांना अभिवादन केलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजमाता जिजामाता यांच्या तसबिरीला देखील अभिवादन केलं.  मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याच्या याच दालनातून उद्धव ठाकरे हे पुढील पाच वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेचा गाडा हाकणार आहेत. 

पदभार स्वीकारताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते हजर होते. याचसोबत उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. शिवसैनिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर मंत्रालयात गर्दी केली आहे.  

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील काना-कोपऱ्यातून विविध लोकं भेटीसाठी आलेत. मंत्रालयात दुपारचा वेळ हा खरंतर लंच टाइम असतो. मात्र सर्व कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटता येईल, त्याची एक झलक आपल्या मोबाईलमध्ये  टिपता येईल यासाठी मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली पाहायला मिळाली.  

Webtitle : uddhav thackeray seats on the chair of chief minister of maharashtra 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT